पार्डीच्या आगग्रस्तांना मिळाला आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:28 AM2021-07-11T04:28:04+5:302021-07-11T04:28:04+5:30
पुसद : येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून पार्डी येथील तीन आगग्रस्त कुटुंबांना निवारे उभारून देण्यात आले. ...
पुसद : येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून पार्डी येथील तीन आगग्रस्त कुटुंबांना निवारे उभारून देण्यात आले.
पार्डी येथे दीड महिन्यापूर्वी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत रत्नमाला प्रमोद शिंदे, गोपाल बंडू शिंदे व कुसुम बंडू शिंदे यांची घरे भस्मसात झाली होती. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भारती मैंद पतसंस्थेचे सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष शरद मैंद यांनी तिन्ही परिवाराचे सांत्वन करीत पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून त्यांच्या निवाऱ्याची उभारणी करण्याचे नियोजन केले. अवघ्या एक महिन्यात एक लाख ४० हजार रुपये खर्च करून त्यांना १२ बाय १० च्या दोन व १० बाय ९ ची एक, अशा तीन खोल्या उभारून तहसीलदार अशोक गीते यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आल्या.
यावेळी शरद मैंद, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, प्रभाकर टेटर, अभिजित पानपट्टे, अमोल व्हडगिरे, मनोज जाधव, संदीप भोने, रामदास केवटे, सलीम भाई, विक्की झरकर, आनंद येरमूलकर, गजानन येरमूलकर, आनंदराव गोरे, सुभाष केवटे, उमाकांत क्षीरसागर, आम्रपाली केवटे, आदी उपस्थित होते.
बॉक्स
व्हॉटस्ॲप ग्रुपवर झाले ८० हजार जमा
आगीच्या घटनेनंतर अभिजित पानपट्टे यांनी व्हॉटस्ॲप ग्रुपवर पीडित परिवारांच्या मदतीचे आवाहन केले. त्यावरून ८० हजार रुपये गोळा झाले. ही रक्कम पुसद अर्बन बँकेत मुदत ठेवीच्या रूपात जमा करण्यात आली. त्या प्रमाणपत्रांचे वाटप परिवारांना करण्यात आले. यावेळी शरद मैंद, दिगंबर जगताप, प्रवीण कदम, आनंद चौधरी, संदीप चौधरी, प्रतीक चव्हाण, अभिजित पानपट्टे, आदी उपस्थित होते.