पुसद येथे राज्यातील पहिली दीक्षा अॅप कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:18 AM2018-08-01T00:18:27+5:302018-08-01T00:20:19+5:30
पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना शिक्षकांनी ‘दीक्षा’ अॅपचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत पंचायत समितीतर्फे येथे कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ही पहिलीच दीक्षा अॅप कार्यशाळा ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना शिक्षकांनी ‘दीक्षा’ अॅपचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत पंचायत समितीतर्फे येथे कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ही पहिलीच दीक्षा अॅप कार्यशाळा ठरली.
पुणे येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते ‘दीक्षा’ अॅपचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील शिक्षकांना अॅपबाबत प्रेरित करणे आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या पुढाकारातून पुसद येथे कार्यशाळा घेण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सभापती रमेश मस्के, उपसभापती गणेश पागिरे, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, विस्तार अधिकारी सुनील साखरे, जरीना बेगम, ताई पराते उपस्थित होत्या. यावेळी दीक्षा अॅपचे ई-साहित्य निर्माते तथा पायलट युजर चंद्रकांत ठेंगे, केंद्रप्रमुख अमित बोजेवार, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक अशोक पोले यांचा सत्कार करण्यात आला. १६ केंद्रातील १७२ शिक्षक, मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला. चंद्रकांत ठेंगे यांनी अॅपची पार्श्वभूमी, शिक्षकांचे योगदान, अॅप वापरबाबत शासनाची भूमिका, वापराच्या तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. केंद्र प्रमुख अमित बोजेवार यांनी शिक्षकांना अॅप वापराबाबत प्रेरित केले.
अशोक पोले यांनी साहित्य निर्मिती करताना शिक्षकांची कौशल्य वृद्धी होते, त्यामुळे अशा साहित्य निर्मितीकरिता त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मुख्याध्यापक शशिकांत जामगडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संगीता निस्ताने, महेंद्र विंचूरकर आदींनी अॅपचा वापर केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाब चव्हाण, मुख्याध्यापक गजानन चिंतावार, केंद्र प्रमुख निवृत्ती बैस्कार, मुकुंद रायपूरकर, हेमंत दळवी, मो.अकिल मो.इरफान, उत्तम चव्हाण, श्रीधर झरकर, शोभना येरावार उपस्थित होते.