पहिला पॉझिटिव्ह झाला ठणठण; स्वत:सह कुटुंबाची घेतोय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:04+5:30
सुरुवातीला कोरोनाबाबत समाजात व यंत्रणेत प्रचंड भीती होती. त्यामुळे अनेकजण फोन करणेही टाळत होते. रुग्णालयात केवळ तिघेच असल्याने योग्य उपचार मिळाला. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर सहकार्य मिळाले. काही दिवस समाजात वावरताना अंतर राखत असल्याचे दिसत होते. आता स्थिती पूर्वपदावर असल्याचा चांगला-वाईट अनुभव पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने सांगितला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्रात पुणे, मुंबई या महानगरांपाठोपाठ यवतमाळात सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. विदेशात पर्यटनासाठी गेलेल्या ग्रुपमधील एक जण पॉझिटव्ह आल्यानंतर त्याची तपासणी झाली. ही माहिती मुंबईवरून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्या कुटुंबाचा शोध घेवून १२ मार्चला त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. १५ दिवस रुग्णालयात आणि २० दिवस गृहविलगीकरणात राहल्यानंतर आता या पहिल्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. दहा महिन्यांच्या काळात त्यांना इतर कुठलाही त्रास झाला नाही.
सुरुवातीला कोरोनाबाबत समाजात व यंत्रणेत प्रचंड भीती होती. त्यामुळे अनेकजण फोन करणेही टाळत होते. रुग्णालयात केवळ तिघेच असल्याने योग्य उपचार मिळाला. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर सहकार्य मिळाले. काही दिवस समाजात वावरताना अंतर राखत असल्याचे दिसत होते. आता स्थिती पूर्वपदावर असल्याचा चांगला-वाईट अनुभव पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने सांगितला.
पहिला रुग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कसे झाले?
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबई येथे ट्रेस झाला. दुबईवरून आलेल्या ग्रुपमध्ये यवतमाळातील तिघांचा समावेश होता. त्यात पुण्यातील एकजण पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांचीच चाचणी झाली. यवतमाळात १२ मार्च रोजी या दाम्पत्याची तपासणी केली. त्यात पती-पत्नी पॉझिटव्ह आले, तर मुलगा पुणे येथे थांबल्याने तेथे तो पाॅझिटिव्ह आला.
कुटुंबात पत्नी, मुलगा दोघेही आढळले पॉझिटिव्ह
पर्यटनासाठी बाहेरदेशात गेलेल्या कुटुंबातील तीनही सदस्य पॉझिटिव्ह आढळले. त्यात ५७ वर्षीय वडील, ५५ वर्षीय आई व २७ वर्षीय मुलगा या तिघांनाही सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची लक्षणे आढळली. विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने अगदी सुरुवातीलाच त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात हे कुटुंबच पॉझिटिव्ह आले.