यवतमाळात साकारणार पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:09 PM2019-06-10T13:09:10+5:302019-06-10T13:11:44+5:30

तळागाळातील व दुर्गम भागातील गरीब, होतकरू खेळाडू शोधून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करून देण्यासाठी क्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून यवतमाळात पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे.

The first private resident, Sports Academy, will be able at Yawatmal | यवतमाळात साकारणार पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी

यवतमाळात साकारणार पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी

Next
ठळक मुद्देक्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालयाचा उपक्रम२० खेळाडूंना प्रवेश, शिक्षण, निवास, भोजन, गणवेष, वैद्यकीय सुविधा

नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तळागाळातील व दुर्गम भागातील गरीब, होतकरू खेळाडू शोधून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करून देण्यासाठी क्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून यवतमाळात पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे. अखिल भारतीय स्तरावर कार्य करणाऱ्या क्रीडा भारतीची ही देशातील पहिलीच क्रीडा प्रबोधिनी ठरणार आहे, हे विशेष.
क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याच्या उद्देशाने रविवारी येथील विवेकानंद विद्यालयात यवतमाळ क्रीडा भारतीतर्फे सभा व चर्चा सत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष सतीश फाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सहमंत्री प्रसन्न हरदास, संपर्कमंत्री राजेश गढीकर, अजय म्हैसाळकर, जिल्हामंत्री दिलीप राखे उपस्थित होते.
प्रस्तावीत क्रीडा प्रबोधिनीत ११ वर्ष वयाच्या मुला-मुलींची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित खेळाडूंना अ‍ॅथेलेटिक्स, स्विमींग, ज्युदो या खेळांचे तज्ज्ञ प्रशिक्षणामार्फत प्रशिक्षण दिले जाईल. क्रीडा प्रशिक्षणाबरोबरच या खेळाडूंना नामांकित शाळेत शिक्षण, निवास, भोजन, स्पोर्टस किट, गणवेश, वैद्यकीय सुविधा देण्यात येईल. ही पूर्णत: निवासी स्वरुपाची क्रीडा प्रबोधिनी राहणार असून यासाठी प्रवेशित खेळाडूंना नाममात्र शुल्क राहणार आहे.
वाणिज्य महाविद्यालयाचे होस्टेल व स्टेट बँक चौक परिसरात मुला व मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था राहणार आहे. दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार आहे. क्रीडा प्रबोधिनी व खेळाच्या माध्यमातून सशक्त, सुसंस्कारित, शिस्तबद्ध, राष्ट्रप्रेमी, युवकांची पिढी देशाकरिता निर्माण करण्याचे कार्य निरंतर चालू राहील, असे सहमंत्री प्रसन्न हरदास यांनी सांगितले.
सभेत क्रीडा प्रबोधिनीची इत्थंभूत माहिती शिरीष टोपरे यांनी प्रास्तविकातून दिली. या प्रसंगी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. चर्चासत्राला किशोर इंगळे, प्राचार्य राजेंद्र क्षीरसागर, मीराताई फडणीस, माणिक पांडे, महेश जोशी, अविनाश जोशी, सुरेश राठोड, दत्तराव धुडे आदी उपस्थित होते.

१६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया
क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरिता रविवार, १६ जून रोजी सकाळी ९ वाजता दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय क्रीडांगणावर शारीरिक क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा चाचणीत जिल्ह्यातील ११ वर्ष पूर्ण आणि १२ वर्षपेक्षा जास्त वय नसलेले मुले-मुली सहभागी होऊ शकतात. या निवड चाचणीतून २० मुले-मली निवडून त्यांना प्रबोधिनीत प्रवेश दिला जाईल. २२ जून रोजी या क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन होईल, असे जिल्हाध्यक्ष सतीश फाटक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The first private resident, Sports Academy, will be able at Yawatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.