बहुजन रंगभूमीच्या ‘गटार’ला प्रथम बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:06 PM2018-12-31T22:06:48+5:302018-12-31T22:07:07+5:30
बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेच्या वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ या एकांकिकेने विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. येथे झालेल्या गजाननदादा बिंड स्मृती स्पर्धेत अमरावतीच्या विशाल तराळ दिग्दर्शित ‘चित्रविचित्र’ या एकांकिकेला द्वितीय, तर गांधर्व बहुद्देशीय संस्था अमरावतीच्या दीपक नांदगावकर दिग्दर्शित ‘चला निघायची वेळ झाली’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल आहे. या तीनही नाट्य संस्थांना अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. येथील भ्रातृमंडळ सभागृहात या स्पर्धा पार पडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेच्या वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ या एकांकिकेने विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. येथे झालेल्या गजाननदादा बिंड स्मृती स्पर्धेत अमरावतीच्या विशाल तराळ दिग्दर्शित ‘चित्रविचित्र’ या एकांकिकेला द्वितीय, तर गांधर्व बहुद्देशीय संस्था अमरावतीच्या दीपक नांदगावकर दिग्दर्शित ‘चला निघायची वेळ झाली’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल आहे. या तीनही नाट्य संस्थांना अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. येथील भ्रातृमंडळ सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. पत्रकार तथा नाट्य लेखक श्याम पेटकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले. नऊ संस्थांच्या नऊ एकांकिका यात सादर झाल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. रमाकांत कोलते हे बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष होते.
प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, विनायक निवल, डॉ. महेश चव्हाण, कलाकांचनच्या अध्यक्ष राजश्री बिंड आदी उपस्थित होते. नाट्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ नाट्यकर्मी दादासाहेब तिवाडे यांना कलाकांचनच्यावतीने ‘कला तपस्वी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिक्षक म्हणून अभिषेक केळकर, आनंद भुरचंडी, कांचन भुतडा यांनी काम पाहिले. बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक पद्माकर मलकापुरे, पाहुण्यांचा परिचय सचिव प्रवीण दमकोंडावार, संचालन तोष्णा मोकडे, आभार विनोद बिंड यांनी मानले. स्पर्धेसाठी प्रमोद बाविस्कर, अशोक कार्लेकर, महेश मोकडे, नयन ढवळे, रोहन धवने, वैभव देशमुख, सागर हांडे, स्वानंद खपली, श्रेयस बिंड, अश्विनी कार्लेकर, नितीन ठाकरे आदींनी पुढाकार घेतला.
नेरचा ओम देशमुख उत्कृष्ट बालकलावंत
उत्तेजनार्थ निर्मिती - ‘आरडीएक्स’ (अस्मिता रंगायतन, यवतमाळ), दिग्दर्शन प्रथम - विशाल तराळ ‘चित्रविचित्र’ (अद्वैत, अमरावती), दिग्दर्शन द्वितीय - वीरेंद्र गणवीर ‘गटार’, अभिनय (पुरुष) प्रथम - अजय वासनिक ‘गटार’, द्वितीय - स्वप्नील शेळके ‘चला निघायची वेळ झाली’, अभिनय (स्त्री) प्रथम - शिवानी धुमाळ ‘आरडीएक्स’, द्वितीय - प्रियंका तायडे ‘गटार’, बाल कलावंत - ओम देशमुख ‘गहाण’ (कलाश्रय, नेर), विनोदी नट - श्रेयस गुल्हाने ‘नाटक बसते आहे’ (कलारसिक, यवतमाळ), नेपथ्य - ‘चला निघायची वेळ झाली’, पार्श्वसंगीत - प्रवीण खापरे ‘सरडा’ (हेमेंदु रंगभूमी, नागपूर), प्रकाश योजना - ‘चला निघायची वेळ झाली’.