‘जेडीआयईटी’च्या शोधप्रबंधाला राष्ट्रीय परिषदेत प्रथम पारितोषिक

By admin | Published: April 17, 2016 02:24 AM2016-04-17T02:24:48+5:302016-04-17T02:24:48+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर विद्यापीठाने ...

The first prize in the National Council for Research on JDIET | ‘जेडीआयईटी’च्या शोधप्रबंधाला राष्ट्रीय परिषदेत प्रथम पारितोषिक

‘जेडीआयईटी’च्या शोधप्रबंधाला राष्ट्रीय परिषदेत प्रथम पारितोषिक

Next

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या वस्त्रोत्सव-२०१६ या राष्ट्रीय शोध परिषदेत सहभाग घेतला. ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शोधप्रबंधाला प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळाला.
या राष्ट्रीय शोध परिषदेत टेक्सटाईल विभागातील विद्यार्थिनी अंकिता डेरे, श्रृती कुहीकर यांनी शोधनिबंध सादर केला होता. त्याचा विषय कंपोझिट मटेरियल इन आॅटोमोबाईल टेक्सटाईल हा होता. द्वितीय पुरस्कार श्रृती कुहीकर, सायली देव, युगा बोबडे, अश्लेषा गांजरे, अंकिता डेरे, अ‍ॅनासिरम, स्वप्नजा राऊत, रंजना साबळे, शिवम वंजारे या विद्यार्थिनींनी फॅशन शो स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त केला. या फॅशन शोची थिम हॉलिडेवर आधारित होती. राष्ट्रीयस्तरावरच्या शोध परिषदेत तृतीय वर्षातील युगा बोबडे हिने अ‍ॅसेसरीज डिझाईनमध्ये सहभाग घेऊन प्रथम पुरस्कार घेतला. तिची डिझाईन बेस्ट फॉर्म वेस्ट यावर आधारित होती. या सर्व विद्यार्थ्यांनी शोध परिषदेत ‘जेडीआयईटी’चे प्रतिनिधित्व केले. परिषदेला जाण्यासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The first prize in the National Council for Research on JDIET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.