राहूर येथे ग्रामीण भागातील पहिली अभ्यासिका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:30 AM2021-02-05T09:30:36+5:302021-02-05T09:30:36+5:30
गावातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात गेले होते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे ते गावाकडे आले. गावात अभ्यासासाठी कुठल्याही ...
गावातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात गेले होते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे ते गावाकडे आले. गावात अभ्यासासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे गावातील तरुण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासापासून दूर होत गेले. याची दखल घेत अमोल काचेवाड व गावातील इतर तरुणांनी एकत्र येत विद्यार्थांना अभ्यास करण्यासाठी व्यवस्था व्हावी, या हेतूने पैसे व जागेची जुळवाजुळव करून स्वामी विवेकानंद अभ्यासिका सुरू केली. अवघ्या तीन दिवसांत सुसज्ज अभ्यासिका उभी राहिली.
उद्घाटन आमदार नामदेव ससाणे यांनी केले. गावातील तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस पाटील ज्योती तोरणपवार. श्रीराम ईरलेवाड, मुख्याध्यापक अतुल होले उपस्थित होते. संचालन विनोद कांबळे, प्रास्ताविक प्रवीण तोरणपवार, तर आभार राजेश सावळीकर यांनी मानले.