दिलासादायक; ५० वर्षांत पहिल्यांदाच कापसाची दहा हजारांवर उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 09:10 PM2022-01-05T21:10:15+5:302022-01-05T21:10:50+5:30
Yawatmal News कापसाची कमी उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला.
यवतमाळ : बुधवारचा दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला. कापसाची कमी उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला.
फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या पार झाला. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच दहा हजारांहून अधिकचा दर मिळाल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी वाढल्याने यंदा दराने उसळी घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे