रागाच्या भरात दोन चिमुकल्यांना जन्मदात्याने पाण्यात बुडवले.. नंतर केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:00 AM2020-08-11T07:00:19+5:302020-08-11T07:00:45+5:30

घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे.

In a fit of rage, the father drowned two kids. he later committed suicide | रागाच्या भरात दोन चिमुकल्यांना जन्मदात्याने पाण्यात बुडवले.. नंतर केली आत्महत्या

रागाच्या भरात दोन चिमुकल्यांना जन्मदात्याने पाण्यात बुडवले.. नंतर केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देअख्खे गाव हळहळले



लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे.
९ ऑगस्ट रोजी दुपारी पुसद तालुक्यात येणाऱ्या सांडवा शिवारांतर्गत जंगलातील पाणवठ्यात वडिलांसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले होते. हा अपघात असल्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र सोमवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने सगळ््यांना धक्का दिला.
पित्याने विषारी औषध प्राशन केल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे वडिलांनीच मुलांना बुडवून मारले व नंतर विष घेतले असा अंदाज आता वर्तविला जातो आहे.

सांडवा शेत शिवारातील शेतात कुटुंबासह राहणारे लक्ष्मण गनाजी बोके ( ३२) यांचे घरी कडक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्यांनी दोन चिमुकली मुलं वैभव (४ )व देवानंद (२) यांना सोबत घेत जंगलातील पाणवठा गाठला. रागाच्या भरात त्याने सुरवातीला दोन्ही चिमुकल्यांना पाणवठ्यात बुडविले. मुलांच्या मृत्यूनंतर त्याने सोबतचे विषारी औषध प्राशन करून पाण्यात उडी मारली. दरम्यान तिघे घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी पाणवठ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. सोमवारी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच काळीज पिळवटून टाकणारी वरील घटना पुढे आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: In a fit of rage, the father drowned two kids. he later committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.