प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:50 PM2017-10-03T21:50:54+5:302017-10-03T21:51:04+5:30

एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

Five accused robbery lover | प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत

प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत

Next
ठळक मुद्देआर्णी-दारव्हा बायपासची घटना : पोलीस पेट्रोलिंगने अनर्थ टळला

यवतमाळ : एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून वाघाडी परिसरातून पाच जणांना ताब्यात घेतले.
विक्की उर्फ ढक्कन ज्ञानेश्वर पवार (१८), शांताराम तुकाराम चिंचकार (२४), राहुल उर्फ गोलू सुरेश गाडेकर (२०), अक्षय दादाराव तोडसाम (१८), नंदू अशोक शेळके (२३) सर्व रा. वाघाडी (यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दरोड्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या मैत्रिणींना घेऊन आर्णी-दारव्हा बायपासवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेले. आर्णी मुख्य मार्गापासून ३०० फूट आतमध्ये एकांत शोधला. त्याच वेळी पाच जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी या दोन तरुणांना बेदम मारहाण केली. तसेच मुलींच्या अंगावरील कपडे फाडण्यास सुरुवात केली. मुलींनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला. त्यातील एका तरुणाने बायपासने धाव घेतली. त्याच वेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर वाहन घेऊन जात होते. त्यांना हा प्रकार दिसताच वाहन थांबविले. पोलीस दिसताच आरोपींनी पळ काढला. या चौघांना वडगाव रोड ठाण्यात आणण्यात आले. रात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली असता वाघाडी परिसरातून पाचही जणांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, शोध पथकाचे सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, गोरख चौधरी, टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार सुरेश मेश्राम, रावसाहेब शेंडे, आशिष चौबे, गौरव नागलकर, गजानन दुधकवडे, संजय राठोड, जमादार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, विनोद राठोड, बंडू मेश्राम यांनी केली.
पालकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन
शिकवणी क्लासच्या नावाखाली मुले-मुली सायंकाळी उशिरापर्यंत घराबाहेर राहतात. याबाबत पालकांनी सतर्कता बाळगावी. आपले पाल्य नेमके कुठे आहेत याची माहिती घ्यावी तसेच प्रेमीयुगुलांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन वडगाव रोडचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केले आहे.

Web Title: Five accused robbery lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.