जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु; 80 जण नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 08:13 PM2020-08-27T20:13:24+5:302020-08-27T20:14:16+5:30
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे
यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युंची एकूण संख्या 75 झाली आहे. तर 80 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 26 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 80 जणांमध्ये 52 पुरुष व 28 महिला आहेत. यवतमाळ शहरातील पाच पुरुष व सहा महिला, कळंब शहरातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील 15 पुरुष व आठ महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, पुसद शहरातील 12 पुरुष व सात महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, वणी तालुक्यातील नऊ पुरुष व दोन महिला, दिग्रस तालुक्यातील एक पुरुष, नेर तालुक्यातील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 654 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 280 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2999 झाली आहे. यापैकी 1990 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 75 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 181 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 129 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 45656 नमुने पाठविले असून यापैकी 44177 प्राप्त तर 1479 अप्राप्त आहेत. तसेच 41178 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.