पाच कोटींचे आरोग्य केंद्र निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:11 PM2018-12-23T22:11:08+5:302018-12-23T22:11:41+5:30

थेट मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन लोकार्पण करूनही तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू निरूपयोगी ठरली आहे. सुमारे पाच कोटी रूपये खर्चूनही ही वास्तू धूळ खात पडली आहे.

Five crore health centers worthless | पाच कोटींचे आरोग्य केंद्र निरूपयोगी

पाच कोटींचे आरोग्य केंद्र निरूपयोगी

googlenewsNext
ठळक मुद्देब्राह्यणगाव पीएचसी : मुख्यमंत्र्यांनी केले होते लोकार्पण

अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : थेट मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन लोकार्पण करूनही तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू निरूपयोगी ठरली आहे. सुमारे पाच कोटी रूपये खर्चूनही ही वास्तू धूळ खात पडली आहे.
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे व स्थानिक लोकप्रतिनीधींच्या उदासीनतेमुळे तब्बल दोन वर्षांपासून बांधकाम पूर्ण होऊनही ब्राम्हणगाव पीएचसीची देखणी वास्तू धूळ खात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात महिन्यांपूर्वी तालुक्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात या वास्तूचे आॅनलाईन लोकार्पण केले होते. त्यामुळे लवकरच आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.
मुख्यमंत्र्यांचा लोकार्पण सोहळा वांझोटा ठरल्याने गावकरी हताश झाले. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने ब्राम्हणगाव येथे प्राथमिक आरोग्य केन्द्रास मंजुरी दिली होती. पाच कोटी रूपये खर्च करून देखणी वास्तू बांधण्यात आली. त्याला आता दीड वर्षे लोटले.
१२ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन लोकार्पणही केले. मात्र या वास्तूकडे आरोग्य विभाग ढुंकूनही पाहण्यास तयार नाही.

शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी उदासीन
ब्राम्हणगाव पीएचसी लोकांच्या सेवेत दाखल करण्यास शासन आणि प्रशासन उदासीन दिसत आहे. पद भरतीच्या नावाखाली केंद्र सुरू होण्यास विलंब लागत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात. आमदार, लोकप्रतिनीधीही उदासीन आहे. त्यामुळे ही वास्तू निरूपयोगी ठरली आहे.

Web Title: Five crore health centers worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.