वणीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:02+5:30

कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिवसांमध्ये कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांविरूद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Five-day public curfew in Wani | वणीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

वणीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

Next
ठळक मुद्देसोमवारपासून अंमलबजावणी । ठराविक वेळेत दूध, कृषी साहित्य, मेडिकल, दवाखाने सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरात कोरोनाचा सातवा रूग्ण आढळल्यानंतर नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून वणीत पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शनिवारी येथे सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.
या जनता कर्फ्यूत सकाळी ७ ते १० या वेळात केवळ दूध विक्री, कृषी केंद्र, मेडिकल व दवाखाने सुरू राहतील. या काळात पेट्रोलपंप सुरू राहणार असले तरी येथून केवळ आपात्कालिन वाहनांसाठीच इंधन दिले जाणार आहे. वणी शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शनिवारी येथील विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, ठाणेदार वैभव जाधव, माजी आमदार विश्वास नांदेकर, संजय देरकर, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राष्ट्रवादीचे डॉ.महेंद्र लोढा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, काँग्रेसचे प्रमोद निकुरे, आरपीआयचे मंगल तेलंग, मिलिंद पाटील, बीएसपीचे प्रवीण खानझोडे, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शहरात कोरोना संदर्भाने चिघळत चाललेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिवसांमध्ये कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांविरूद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वणीत वाहनांना प्रवेशबंदी
शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत घोषित करण्यात आलेल्या या जनता कर्फ्यूदरम्यान, खासगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. पाच दिवस केवळ आपात्कालिन वाहनेच ये-जा करतील. याव्यतीरिक्त कोणत्याही वाहनांना वणीत प्रवेश दिला जाणार नाही.
वणीत सातवा रूग्ण आढळल्याने चिंतेत वाढ
शनिवारी प्राप्त झालेल्या आठ रिपोर्टपैकी सात जण निगेटीव्ह, तर एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे प्रशासनाने संंबंधित महिला ज्या परिसरात राहते, तो परिसर सील करण्याच्या कारवाईला प्रारंभ केला आहे. तिच्या कुटुंबासह आजुबाजूच्या काही व्यक्तींना परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जनता कर्फ्यूदरम्यान आपात्कालिन स्थितीत मदत मिळण्याकरिता काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येणार आहेत. त्या क्रमांकावर मदत मिळणार आहे.

Web Title: Five-day public curfew in Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.