पाच कीटकनाशकांवर पश्चिम विदर्भात ६० दिवस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 10:05 AM2017-11-30T10:05:01+5:302017-11-30T10:07:09+5:30

कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूची दखल घेत प्रधान कृषी सचिवांनी पश्चिम विदर्भात पाच प्रकारच्या कीटकनाशक संमिश्रणांवर पुढील ६० दिवसांसाठी विक्रीवर बंदी घातली आहे.

Five insecticides are prohibited for 60 days in western Vidarbha | पाच कीटकनाशकांवर पश्चिम विदर्भात ६० दिवस बंदी

पाच कीटकनाशकांवर पश्चिम विदर्भात ६० दिवस बंदी

Next
ठळक मुद्देप्रधान कृषी सचिवांचे आदेश जारीकीटकनाशक परवाने आता एसएओकडे

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूची दखल घेत प्रधान कृषी सचिवांनी पश्चिम विदर्भात पाच प्रकारच्या कीटकनाशक संमिश्रणांवर पुढील ६० दिवसांसाठी विक्रीवर बंदी घातली आहे.
प्रधान कृषी सचिव विजय कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत. अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटकनाशक विक्रीला मनाई करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रोफेनोफोस, फीप्रोनील, अ‍ॅसिफेट, डिफेन्थीरोन आणि मोनोक्रोटोफॉस या संमिश्रणांचा समावेश आहे. या आदेशात नमूद केले की, यवतमाळ जिल्ह्यात उपरोक्त विक्रीबंदी केलेल्या कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यामुळे विषबाधा होऊन १८ शेतकरी-शेतमजुरांना जीव गमवावा लागला. ही कीटकनाशके आत्यंतीक विषारी आहे. त्याचा अनधिकृतरीतीने संमिश्रणासाठी वापर करण्यात येत असल्यामुळे त्याची अत्यंत विषारी बाधा होते. उपरोक्त गटातील कीटकनाशकांचा वापर किंवा मिश्रण मनुष्य जातीस किंवा प्राण्यांना धोकादायक ठरू शकते. कीटकनाशकांची विक्री, वितरण आणि वापर याचा घातक परिणाम लक्षात घेता त्याच्यावर राज्यात यापुढे कायम बंदी चालू ठेवण्याची आवश्यकता असल्याचे शासनाचे मत आहे. त्यामुळेच या कीटकनाशकांना पुढील ६० दिवस अर्थात दोन महिने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात विक्री व वापरास बंदी घालण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कीटकनाशक परवाने आता ‘एसएओ’कडे
सद्यस्थितीत खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्री, साठ्याचे परवान्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडे (एडीओ) आहेत. परंतु यवतमाळातील कीटकनाशक बळी प्रकरणानंतर आता कीटकनाशक विक्री व साठ्याचे परवान्याचे अधिकार ‘एडीओ’कडून काढून घेऊन शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे (एसएओ) सोपविण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी प्रधान कृषी सचिव विजय कुमार यांनी या संबंधीची अधिसूचना जारी केली आहे. बियाणे व खताचे परवान्याचे अधिकार अजून तरी ‘एडीओ’कडे कायम आहेत.

Web Title: Five insecticides are prohibited for 60 days in western Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती