पाच लाखांचे सोयाबीन जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:27 PM2018-10-27T21:27:53+5:302018-10-27T21:29:29+5:30
सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बोरगाव लिंगा येथे घडली. या परिसरात सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याची पाच वर्षातील नववी घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बोरगाव लिंगा येथे घडली. या परिसरात सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याची पाच वर्षातील नववी घटना आहे.
बोरगाव लिंगा येथील राजेश गणेडीवाल यांच्या शेतातील सोयाबीन कापून शेतात गंजी लावून ठेवण्यात आली होती. २२ एकरातील सोयाबीच्या या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यात पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गतवर्षीही गणेडीवाल यांच्या तुरीच्या गंजीला आग लागली होती. त्यांचेच शेतशेजारी संजय देशमुख, प्रभाकर भाजीपाले, सुधाकर भाजीपाले, ओमप्रकाश गणेडीवाल, विलास झेंडे, प्रकाश भाजीपाले यांच्या शेतमालाला आग लावून देण्यात आली होती.
दरम्यान राजेश गणेडीवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेती पिकाला आग लावण्याच्या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. सदर प्रकार करणाऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दिनेश राठोड यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.