पाच नगरपरिषदांना सीओच नाहीत

By admin | Published: June 5, 2014 12:01 AM2014-06-05T00:01:22+5:302014-06-05T00:01:22+5:30

मुख्याधिकार्‍यांसह इतर विभागातील रिक्त पदांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. तीन नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही तर दोन ठिकाणचे मुख्याधिकारी रजेवर गेले आहे.

Five municipal councils do not have couch | पाच नगरपरिषदांना सीओच नाहीत

पाच नगरपरिषदांना सीओच नाहीत

Next

कारभार ढेपाळला : रिक्त पदांचे ग्रहण
मुकेश इंगोले - दारव्हा
मुख्याधिकार्‍यांसह इतर विभागातील रिक्त पदांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. तीन नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही तर दोन ठिकाणचे मुख्याधिकारी रजेवर गेले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामकाजासोबतच शहरातील स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील मोठय़ा नगरपालिका असणार्‍या वणी, पुसद व उमरखेड या ठिकाणच्या मुख्याधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. तर दारव्हा व नेर येथील मुख्याधिकारी दीर्घ सुटीवर गेले आहे. या प्रमुख अधिकार्‍यांसह बर्‍याच ठिकाणी इतरही कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्याच बरोबर अग्नीशमन दलाची यंत्रणाही कर्मचार्‍यांविना आहे. कार्यक्षेत्रातील नागरिकांना रस्ते, पथदिवे, पाणी व साफसफाई या मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी नगरपालिकेमध्ये मुख्याधिकार्‍याचे पद अतिमहत्वाचे आहे. त्यांच्या माध्यमातूनच विकास कामाला गती देण्यात येते. मात्र अनेक नगरपालिकांना मुख्याधिकारीच नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यवतमाळनंतर जिल्ह्यात वणी व पुसद ही मोठी शहरे आहेत. मात्र त्या ठिकाणच्या नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही. उमरखेडमध्येसुद्धा मुख्याधिकार्‍याचे पद रिक्त आहे. दारव्ह्याचे मुख्याधिकारी अतुल पंत व नेरचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर रजेवर गेले आहे. तब्बल पाच मोठय़ा नगरपालिकांना मुख्याधिकारी नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणचे प्रभार इतर मुख्याधिकार्‍यांकडे देण्यात आले. मात्र त्यांचा वेळ येण्या-जाण्यात जात असल्यामुळे दोनही ठिकाणच्या कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुख्याधिकार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे साफसफाईंच्या कामाच्या नियोजनात अडथळा निर्माण झाला आहे.  मुख्याधिकार्‍यांप्रमाणेच काही नगरपालिकांमध्ये बांधकाम, पाणीपुरवठा या महत्त्वपूर्ण विभागाच्या अभियंत्यांची तसेच आरोग्य निरीक्षकाचे पदसुद्धा रिक्त आहे. अनेक नगरपरिषदांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. परंतु या विभागातील कर्मचार्‍यांची भरतीच न झाल्यामुळे या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
 

Web Title: Five municipal councils do not have couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.