मध्यरात्री धुमाकूळ घालणारे पाच दरोडेखोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:06 PM2022-09-27T23:06:19+5:302022-09-27T23:07:59+5:30

शेख शबीर शेख हनीफ (३५) रा. बिटरगाव यांच्या घराचा कोयंडा तोडून सात जण बळजबरीने घरात शिरले. त्यांनी शेख शबीर व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. रोख १५०० रुपये, सोन्याची पोत लुटली. नंतर लागूनच असलेल्या हनुमान मंदिरात दरोडेखोर गेले. तेथे संजय गंगाराम बुटले याला मारहाण करून दानपेटी फोडत तीन हजार रुपये रोख काढून घेतले. दरोडेखोर गावात शिरल्याची वार्ता पसरताच संपूर्ण गाव जागे झाले.

Five robbers arrested in the middle of the night | मध्यरात्री धुमाकूळ घालणारे पाच दरोडेखोर अटकेत

मध्यरात्री धुमाकूळ घालणारे पाच दरोडेखोर अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बिटरगाव : धारदार शस्त्र घेऊन बिटरगाव येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीने सोमवारी मध्यरात्रीनंतर थेट एका घरात प्रवेश केला. तेथे दाम्पत्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. जवळपास ५४ हजारांचा मुद्देमाल लुटला. त्यानंतर हनुमान मंदिरात दानपेटी फोडली. इतकेच नव्हे तर वनविभागाच्या चौकीवरही दगडफेक करीत त्याची तोडफोड केली. या घटनांनी गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थ व पोलिसांनी संयम दाखवित जंगलाच्या दिशेने पळालेल्या दरोडेखोरांचा पाठलाग केला. यातील पाच जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. दोघे पसार झाले. 
शेख शबीर शेख हनीफ (३५) रा. बिटरगाव यांच्या घराचा कोयंडा तोडून सात जण बळजबरीने घरात शिरले. त्यांनी शेख शबीर व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. रोख १५०० रुपये, सोन्याची पोत लुटली. नंतर लागूनच असलेल्या हनुमान मंदिरात दरोडेखोर गेले. तेथे संजय गंगाराम बुटले याला मारहाण करून दानपेटी फोडत तीन हजार रुपये रोख काढून घेतले. दरोडेखोर गावात शिरल्याची वार्ता पसरताच संपूर्ण गाव जागे झाले. ग्रामस्थ दरोडेखोरांचा शोध घेऊ लागले. यामुळे दरोडेखोरांनी जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. 
या घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांपर्यंत पोहोचली. ठाणेदार प्रताप भोस व काही ग्रामस्थ यांच्या मदतीने पथक तयार करण्यात आली.  
जाकी बावाजी चव्हाण (२८) रा. सोनारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड, मांगीलाल श्रीरंग राठोड (३८) रा. हिमायतनगर, विकास श्रीरंग राठोड (२२) रा. हिमायतनगर, नीलेश गब्बरसिंग राठोड (२२) रा. हदगाव, दत्ता मांगीलाल राठोड (३०) रा. गणेशवाडी, ता. हिमायतनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन चाकू, एक रॉड, एक कुऱ्हाड, दोन मोबाइल ही घातक शस्त्रे जप्त केली. याशिवाय चोरीतील २२ तोळे चांदी, सात ग्रॅम सोन्याचा हार असा ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 
बिटरगाव येथील पोलीस मित्रांना सोबत घेऊन ठाणेदार भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, शिपाई मोहन चाटे, अतिश जारंडे, गजानन खरात, रवी गिते, विद्या राठोड, दत्ता कुसराम, सतीश चव्हाण, नीलेश भालेराव, स्वप्निल रायवाडे, फिरोज काझी, होमगार्ड चंद्रमणी वाढवे यांनी आरोपीला घटनेनंतर अवघ्या चार तासात अटक केली. 
या कारवाईची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे बिटरगाव येथे पोहोचले. आरोपींकडून इतरही दरोड्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याचा तपास उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरोड्याच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वनविभागाच्या चौकीवर हल्ला करून तोडफोड 
- वनविभागाची चौकी लागली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यात आपण कैद झालो असा संशय त्यांना आला. दरोडेखोरांनी चौकीवर हल्ला चढविला. तेथील वन कर्मचारी राजू देवकते यास जरब दाखवित चौकीतील साहित्याची तोडफोड केली. दरोडेखोर आक्रमक होते.  मोबाईलच्या उजेडात पळणारे दरोडेखोर राखणदारांच्या नजरेस पडले. त्यावरुन माग काढला. 

दोन दरोडेखोर झटापटीत झाले पसार 
- एक पथक गांजेगावकडे तर दुसरे जेवली पिंपळगाव येथे रवाना झाले. गांजेगाव येथील पथकाने दोन दरोडेखोरांना पकडले तर पिंपळगावचे पथक पुलावर दबा धरून बसले होते. दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. याचा प्रतिकार करीत पोलीस व ग्रामस्थ दरोडेखोरांवर चालून गेले. येथे तीन जणांना ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर या झटापटीत पसार झाले. 

 

Web Title: Five robbers arrested in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.