कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 09:57 PM2019-07-24T21:57:20+5:302019-07-24T21:58:06+5:30

वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.

Five thousand pairs of agri-pumps were stuck | कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

Next
ठळक मुद्देएचव्हीडीएस कुचकामी : दुष्काळात शेतकऱ्यांपुढे नवे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. हे सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर आहे. धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. यामुळे सिंचन करता येणार असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. यातून शेतकºयांपुढील अडचणीत भर पडली आहे.
वीज वितरण कंपनीने मार्च २०१८ पर्यंतच वीज जोडणीचे अर्ज स्वीकारले आहेत. यानंतर दिले जाणारे अर्ज आॅनलाईन यंत्रणेवर स्वीकारलेच जात नाही. यामुळे यानंतरच वीज जोडणी संख्या गुलदस्त्यात आहे. सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे वीज जोडणीचे सहा हजार ८८७ अर्ज वीज वितरण कंपनीकडे आले आहे. या शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून जोडण्या दिल्या जाणार होत्या. त्याकरिता वीज वितरण कंपनीने योजनाही जाहीर केली. या योजनेत वीज जोडणी करताना एक शेतकरी एक डीपी असा नियम जाहीर करण्यात आला. जितके अर्ज तितक्याच डीपी शेतकऱ्यांना लागणार होत्या.
त्याचे कंत्राट त्रयस्त संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेने तत्काळ डीपी पुरवठा करण्याचा शब्द वीज कंपनीला दिला होता. प्रत्यक्षात या डीपी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत. दुष्काळी स्थितीत पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा कृषीपंपाच्या वीज जोडण्या तत्काळ सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी वीज कंपनीकडे येरझारा सुरू केल्या आहेत. मात्र डीपीच उपलब्ध नाही. यामुळे वीज जोडण्या आता थांबल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळातही महावितरणची यंत्रणा शेतकºयांना आणखी अडचणीत आणण्याचे काम करीत आहे.

एचव्हीडीएस योजनेतून ८१७ वीज जोडण्या
वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून आतापर्यंत ८१७ वीज जोडण्या करून दिल्या आहेत. तर २१० वीज जोडण्या प्रगतीपथावर आहे. यानंतरही जवळपास पाच हजार जोडण्या प्रलंबित आहेत.

वीज जोडणी करण्याचे काम कंपनीने युध्दपातळीवर सुरू केले आहे. वीज जोडणीसाठी लागणाºया डीपी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. त्यानुसार जोडणीचे काम करण्यात आले आहे.
- सुरेश मडावी
अधीक्षक, अभियंता
वीज वितरण कंपनी

Web Title: Five thousand pairs of agri-pumps were stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.