जिल्ह्यात पाच हजार जलस्त्रोत दूषित
By admin | Published: June 11, 2014 11:37 PM2014-06-11T23:37:23+5:302014-06-11T23:37:23+5:30
जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये सात हजार पाण्याचे स्त्रोत असून त्यातील पाच हजार जलस्त्रोत दुषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये सात हजार पाण्याचे स्त्रोत असून त्यातील पाच हजार जलस्त्रोत दुषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सांडपाणी आणि कचरा यांची विल्हेवाट न लागल्याने पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहे. दूषित जलस्त्रोत असलेल्या ग्रामंपचायतीला लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड देण्यात आले आहे. या ठिकाणी तत्काळ उपाय योजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला दिले आहे. यानंतरही ग्रामपंचायतीने कुठल्याही उपाय योजना केल्या नाहीत. खबरदारी म्हणून पावसाळ्यापूर्वीच उपाय करण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचल्ले आहे. १६ उपके ंद्राच्या ठिकाणी शीर्घ आरोग्य पथक तयार ठेवण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभागाची चमू तयार करण्यात आली आहे. २१ प्रकारच्या विविध औषधी या पथकाकडे उपलब्ध राहणार आहे. १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करताच शीर्घ भरारी पथक तत्काळ संबंधित ठिकाणी दाखल होणार आहे. (शहर वार्ताहर)