खर्डा प्रकल्पासाठी पाच गावांची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:06 PM2019-07-21T22:06:51+5:302019-07-21T22:07:41+5:30

खर्डा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी पाच गावातील नागरिकांची सभा सरूळ येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात पार पडली. प्रकल्प पूर्ण करा, सरूळचे पुनर्वसन करण्यात यावे, शेतीला पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी लाऊन धरली.

Five villages united for Kharda project | खर्डा प्रकल्पासाठी पाच गावांची एकजूट

खर्डा प्रकल्पासाठी पाच गावांची एकजूट

Next
ठळक मुद्देमध्यम प्रकल्प : सरूळच्या शिवमंदिरात शेतकरी, गावकऱ्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : खर्डा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी पाच गावातील नागरिकांची सभा सरूळ येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात पार पडली. प्रकल्प पूर्ण करा, सरूळचे पुनर्वसन करण्यात यावे, शेतीला पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी लाऊन धरली.
बाभूळगावपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खर्डा लघुसिंचन प्रकल्पाच्या कामाला सन २००६ मध्ये सुरुवात झाली. मातीकामानंतर हा प्रकल्प रखडला. घाईगर्दीत या प्रकल्पासाठी शासनाची मंजुरात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सरूळ हे गाव ७० टक्के पाण्यात राहील, ही बाब काही काळानंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. तेव्हा या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे आला. लगेच प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. आजही त्याच स्थितीत आहे.
सरूळ ग्रामस्थ पुनर्वसनासाठी तयार आहेत. यासाठी सभा झाल्या, ग्रामसभेचे ठराव झाले. पुनर्वसनासाठी जागेची पाहणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तालुक्यातील घारफळ येथे आले असता त्यांनी खर्डा प्रकल्पासाठी निधीची तरतूद केल्याची घोषणा केली. आता खर्डा लघुसिंचन प्रकल्पाऐवजी वॉटर टँक करण्याचे शासनाने योजिले असल्याचे अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. वॉटर टँक झाल्यास सरूळचे पुनर्वसन करण्याची गरज नाही, असे सांगण्यात येते.
सिंचनासाठी पाणी द्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने परिसरातील शेतकºयांची सभा घेण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री वसंत पुरके यांचीही उपस्थिती होती. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी यावेळी दर्शविण्यात आली. सभेला डॉ. रमेश महानूर, सरूळचे सरपंच विनोद ताजने, नरेंद्र कोंबे, अतुल देशमुख, अतुल राऊत, मधुकर थोटे, विलास सोळंके, शरद परडखे, पंकज गावंडे, अशोक ताजने, महेंद्र घुरडे, दिलीप भाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Five villages united for Kharda project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.