शेती आणि शेतकºयांवरच फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:01 PM2017-09-11T22:01:59+5:302017-09-11T22:02:22+5:30

शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून....

Focus on Agriculture and Farmer areas | शेती आणि शेतकºयांवरच फोकस

शेती आणि शेतकºयांवरच फोकस

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी राजेश देशमुख : प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची कृषी आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती झाली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. शेतकरी व शेती संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या योजना अतिशय पारदर्शकपणे राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचा निधी मंजूर कामावर वेळेत कसा खर्च होईल, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्व विभागांच्या समन्वयातून या योजना राबविल्या जातात. विशेष करून जिल्हा परिषदेची यंत्रणा नियोजन समितीचा निधी मोठ्या प्रमाणात खर्च करते. त्यासाठी विविध समित्यांकडून जिल्हा परिषदेत मंजुरी घ्यावी लागते. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. त्यांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील फ्लोराईड युक्त पाणी असलेल्या गावांची माहिती घेतली. या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याबाबत तोडगा काढण्यावर काम करणार आहे. शेतकºयांना पूरक व्यवसाय म्हणून दुध उत्पादन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी जिल्हाधिकाºयांचे आगमन होताच अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, राष्टÑीय सूचना व माहिती केंद्राचे राजेश देवते, उपजिल्हाधिकारी महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
एमपीएससीत दुसरा क्रमांक
जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. राजेश देशमुख १९९२ मध्ये महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. जून १९९३ मध्ये बीड येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते शासन सेवेत रुजू झाले. त्यानंतर बीड येथे उपविभागीय अधिकारी, नांदेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी आणि विविध मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. सातारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमूख उपक्रम राबविले. त्याची दखल राष्टÑीय व राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.

Web Title: Focus on Agriculture and Farmer areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.