वसतिगृहासाठी पाठपुरावा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:33 PM2018-02-25T23:33:50+5:302018-02-25T23:33:50+5:30

बंजारा समाज बांधवांनी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असून त्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

Follow up for the hostel | वसतिगृहासाठी पाठपुरावा करू

वसतिगृहासाठी पाठपुरावा करू

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : आर्णी येथे राज्यस्तरीय बंजारा समाज प्रबोधन पर्व

ऑनलाईन लोकमत
आर्णी : बंजारा समाज बांधवांनी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असून त्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
येथील तीर्थरूप मंगल कार्यालय परिसरातील संत सेवालालनगरीत दिवंगत रामजी आडे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय बंजारा समाज प्रबोधनपर्व व सांस्कृतिक महोत्सवातील बंजारा समाज अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिषदेत अध्यक्षस्थानावरून ना.अहीर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार राजू तोडसाम, प्रेमदास महाराज वनोलीकर, डॉ.टी.सी. राठोड, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, दिनकर पावडे, बाबुसिंग नाईक, गणपतराव राठोड, भारत राठोड, अनिल आडे, राजुदास जाधव, नवलकिशोर राठोड, दिलीप राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण, पी.पी. पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ना.अहीर म्हणाले, जिल्ह्यात सतत शेतकरी आत्महत्या होत आहे. देशात गरिबी आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. यावर सरकार आता उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल.
शेतकºयांनीही रबी व कोरडवाहू उत्पन्नासोबत जोडव्यवसाय करण्याचे आवाहन त्यांनी केले. बंजारा समाजासह सर्वांनीच आपली संस्कृती जतन केली पाहिजे, असे ना.अहीर यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना असून अधिकारी मात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करतात. तथापि, आपण त्यांच्याकडून योजना प्राप्त करून घेतल्या पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले पाहिजे. बंजारा समाज बांधवांनी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी केली. या मागणीचा आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी हमी त्यांनी दिली.
शिक्षण समाजाला दिशा देते
बंजारा समाज अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिषदेत मार्गदर्शन करताना आमदार राजू तोडसाम यांनी शिक्षण समाजाला दिशा देते, असे सांगून संत सेवालाल महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केल्याचे सांगितले. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुटी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. इतर आमदारांनी सहकार्य केले. बंजारा समाजाचे अनेक अधिकारी आहे. ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. संत सेवालाल महाराज यांचे विचार सर्वांनी अंगिकारावे, असे आवाहन आमदार तोडसाम यांनी केले. तसेच बंजारा भाषा लोप पावू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Follow up for the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.