पुसदमध्ये मातृभूमी फाउंडेशनतर्फे अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:13+5:302021-03-07T04:39:13+5:30
पुसद : येथील मातृभूमी फाउंडेशनतर्फे संचारबंदी काळात प्रवासी, रुग्ण व निराधारांना अन्नदान केले जात आहे. शहर व तालुक्यात कोरोनाच्या ...
पुसद : येथील मातृभूमी फाउंडेशनतर्फे संचारबंदी काळात प्रवासी, रुग्ण व निराधारांना अन्नदान केले जात आहे. शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शहर व ग्रामीण भागात ३ ते ८ मार्चपर्यंत संचारबंदी लागू आहे.
शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडावे लागते. संचारबंदीमुळे त्यांना कुठेही चहा, पाणी व भोजन करण्याची व्यवस्था नाही. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील मातृभूमी फाउंडेशनच्यावतीने बसस्थानक परिरसरात प्रवासी निवाऱ्यामध्ये थांबलेल्या ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, निराधार व गरजूंना दोन वेळेस भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालय व शहरातील दवाखाने आदी ठिकाणी जाऊनही फाउंडेशनचे सदस्य भरती रुग्ण व नातेवाईकांना भोजन वाटप करीत आहे. बसस्थानक येथे फाऊंडेशनच्यावतीने थंड पाणी साठवून प्रवाशाकरिता मातीचे माठ उपलब्ध करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश शेवाळकर, उपाध्यक्ष शैलेश उत्तरवार, कोषाध्यक्ष प्रीतम राज अलवार, सदस्य हरीश चौधरी, अविनाश सरगर, विशाल पोले आदी सहभागी आहेत.