रस्त्यालगत वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:36 PM2018-11-23T22:36:53+5:302018-11-23T22:37:25+5:30
शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
उमरखेड ते ढाणकी मार्गावर रस्त्यालगत अनेक सागवान वृक्ष खाली कोसळलेल्या अवस्थेत दिसून येतात. कोसळलेल्या वृक्षांची काही थूटं नजेत भरतात. त्यामुळे हा सानवाग तस्करीचा तर प्रकार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सागवानाची अनेक वृक्ष कापलेली असतानाही वन विभाग लक्ष देण्यस तयार नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची निष्क्रियता सामोरे येत आहे.
रस्त्यालगतच्या सागवान वृक्षांची नंबरींग करणे गरजेचे असते. मात्र रस्त्यालगत किती वृक्ष आहेत, वृक्षांची गोलाई किती, उधळलेल्या, कोसळलेल्या वृक्षांची डेपोत विल्हेवाट लावणे, आदी महत्वाची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीची जाणीव नसलेल्या वनाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अर्थात जाणीवपूर्वक या प्रकाराकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते.
तालुक्यात लागवड करण्यात आलेले अनेक वृक्ष वाळली आहे. संगोपनाअभावी अनेक वृक्ष करपली आहेत. ती त्याच अवस्थेत भी दिसत आहे. वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना केली नाही. वादग्रस्त संबंधित अधिकाºयांना उमरखेडसारखे वनपरिक्षेत्र का दिले असावे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दक्षता पथकही ठरले कुचकामी
उमरखेड विभागातर्फे वृक्षांची योग्य काळजी घतेली जात नाही. मात्र विभागाचे दक्षता व गुण नियंत्रक पथकानेही लक्ष दिले नाही. तक्रारीवरून काही भागात स्थळ पहाणी केली. मात्र त्यासमोर कारवाई पुढे सरकली नाही. वरिष्ठांची मनधरणी करून हे पकरण थंडबस्त्यात ठेवण्यात आले. याबाबत लोकप्रतिनिदीसुद्धा मूग गिळुन बसले आहे. विरोधकसुद्धा आवाज उठविताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.