आर्णी येथे उत्सव समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:42 AM2021-04-09T04:42:15+5:302021-04-09T04:42:15+5:30
आर्णी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे गठन करण्यात ...
आर्णी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे गठन करण्यात आले.
कोरोना काळात कशा प्रकारे व कशी जयंती साजरी करायची, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला विचार मंच अध्यक्ष नालंदा भरणे, युवराज गोसावी, विष्णू इंगोले, मधुसुधन भवरे, देवकांत वंजारे, किरण कानंदे, सुनील भगत, राहुल मानकर, रेणुराव गावंडे, जयराज मुनेश्वर, नालंदा देवतळे, वसंता नगराळे, संतोष मेशराम, बालू बन्सोड, नागोराव बन्सोड, भाऊ सरपे, संदेश भगत, रवींद्र देवतळे, सुमित पाटील, विनोद मनवर, समीर पुनवटकर, गोपाल भगत आदी उपस्थित होते.
या बैठकीत यावर्षीसाठी जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी प्रसेनजीत पुनवटकर, उपाध्यक्ष संदेश भगत, सचिव निकेत इंगोले, सहसचिव प्रसेनजीत खंडारे, कोषाध्यक्ष कमलेश खरतडे, तर सह कोषाध्यक्ष म्हणून संघर्ष मुनेश्वर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्राशिक नगराळे, प्रतीक भगत, भूषण इंगोले, धीरज मुजमुळे, सूरज भगत, क्षितिज भगत, प्रतीक कांबळे, प्रतीक खोब्रागडे, तन्मय बागुल, अभिजीत चक्रणायन, आकाश वानखेडे, अनिकेत नगराळे, हर्ष मानकर, सागर वंजारे, प्रवीण रोडे, मयूर दवणे, निखिल दवणे, आकाश रोडे, पवन कांबळे, पंकज कांबळे, प्रीतम नरवाडे, अक्षय पेटारे, सनी वाघमारे, सार्थक भगत, किरण भगत, संदेश कांबळे, पुष्पक कानंदे, सुजित पाटील, शुभम भगत, कुणाल भगत, नरेंद्र वाघमारे, ऋतिक नगराळे, रुपेश भगत आदींची निवड झाली. बैठकीला समाजबांधव, भिमसैनिक, संविधान ग्रुप व सम्राट वाॅरियर्स सदस्य उपस्थित होते.