पुसद येथे माजी आमदार खडसे यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:43+5:302021-08-20T04:48:43+5:30
पुसद : येथील मागासवर्गीय लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, दलितमित्र, दिवंगत अण्णासाहेब खडसे यांची ११४वी जयंती ...
पुसद : येथील मागासवर्गीय लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, दलितमित्र, दिवंगत अण्णासाहेब खडसे यांची ११४वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महेश खडसे होते. मुख्याध्यापक संजीव वाघमारे, सुरेश नारखेडे, पी. एस. जाधव, रूपेश आसेगावकर, धावपटू आकाश धुळे, आदींची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते अण्णासाहेब खडसे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील देशात तिसरा व राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविणारा शाळेचा माजी विद्यार्थी आकाश धुळे यांचा संस्थाध्यक्ष महेश खडसे यांच्या हस्ते दोन हजार रुपये रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
संजीव वाघमारे, सुरेश नारखेडे, नीतेश आवारी, आदींनी अण्णासाहेब खडसे यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले. आकाश धुळे यांनी भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाची मान उंचावण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. महेश खडसे यांनी धावपटू आकाश धुळे यांना पुढील वाटचालीसाठी दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. संचालन अनंत माळकर यांनी केले. आभार नीता उके यांनी मानले. याप्रसंगी प्रा. प्रकाश लामणे, श्रीकांत भागवत, पांडुरंग बुरकुले, नितीन लोळगे, दत्ता शिंदे, राजाराम तिवारी, विशाल इंगोले, समीर शेख, प्रमोद केंद्रे, छगन वाघ, विनय ठोंबरे, प्रवीण पाईकराव, संदीप राठोड, गणेश घुगरे, रामदास घाटे, प्रदीप रंगारी, नफीज पठाण, आदी उपस्थित होते.