यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार अनंतराव देवसरकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:10 PM2020-11-26T12:10:40+5:302020-11-26T12:10:58+5:30
Yawatmal News उमरखेड विधानसभेचे माजी आमदार अँड. अनंतराव देवसरकर यांचे आज २६ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उमरखेड विधानसभेचे माजी आमदार अँड. अनंतराव देवसरकर यांचे आज २६ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष
पुसद येथील सूतगिरणीचे ही अध्यक्ष होते शिवाय इतरही अनेक संस्थेचे पदाधिकारी असणारे अँड.अनंतराव देवसरकर यांची उमरखेड विभागांमध्ये 'वकील साहेब' म्हणून वेगळी ओळख होती.जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहायला जात होते. त्यांनी उमरखेड उमरखेड विधानसभेचे दोन वेळा नेतृत्व केले होते. आज औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयांमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर व डॉ.भरत देवसरकर ही दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मूळ गावी चातारी येथे होणार आहे.