एआयसीटीईचे माजी अध्यक्ष मंगळवारी ‘जेडीआयईटी’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:26 IST2019-03-15T22:25:41+5:302019-03-15T22:26:33+5:30
आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस. मंठा आणि या संस्थेचे माजी सल्लागार डॉ.एस.जी. भिरुड हे मंगळवार १९ मार्च रोजी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहे.

एआयसीटीईचे माजी अध्यक्ष मंगळवारी ‘जेडीआयईटी’मध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ : आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस. मंठा आणि या संस्थेचे माजी सल्लागार डॉ.एस.जी. भिरुड हे मंगळवार १९ मार्च रोजी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहे.
शैक्षणिक प्रणाली, अभ्यासक्रम प्रभावी अंमलबजावणी, शिक्षकांची गुणवत्ता, संशोधन व विकासकार्य, आधारभूत सुविधा, वित्तिय सुविधा, विद्यार्थी पुरक दृष्टीकोन, कॅम्पस ड्राईव्ह आदी घटकांवर यावेळी समुपदेशन होणार आहे.
डॉ. मंठा यांचे महाविद्यालयाच्या विकासाभिमुख कार्यात नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे संस्थेचे सचिव किशोर दर्डा व प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी यांनी प्रामुख्याने नमूद केले आहे.
‘नेक’ मानांकन
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नेक’ मानांकन मिळाले आहे. ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्युट इन इंडिया’ अवार्डनेही सन्मानित केले आहे. २०१६ मध्ये एज्यू-रँड युएसएने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रथम तर महाराष्ट्रातील पहिल्या दहाच्या यादीत स्थान दिले होते. २०१७ साली आयआरआयएफने (इनोव्हेटर अॅन्ड रिसर्चर इंटरनॅशनल फोरम, अमेरिका) ग्रेड ‘ए’ तसेच नॅशनल एज्युकेशन लिडरशीप अवार्डस्तर्फे वेस्ट झोनमधील ‘आऊट स्टॅडिंग इंजिनिअरिंग इंस्टीट्यूट व बेस्ट इंस्टीट्यूट इन इव्हेंटस्) असे सन्मान मिळाले आहे. महाविद्यालयातील विविध व अद्यावत सोयी, सुविधा विचारात घेऊन हे अवार्डस् दिले जातात.