‘जेडीआयइटी’च्या माजी विद्यार्थ्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:43 PM2019-04-10T21:43:45+5:302019-04-10T21:44:39+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अजिंक्यचे पेटंट नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील आहे. पाणी निर्जंतुकीकरण, शेती आदींशी जुळलेले आहे. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात गंभीर झालेल्या प्रश्नांना त्याने हात घातला आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याने ही भरारी घेतली आहे. चार पेटंट्स तर त्याने एकाच दिवशी आपल्या नावावर केले आहेत. विविध प्रयोगाची जंत्रीच अजिंक्यजवळ आहे. यूथ आयकॉन पुरस्काराच्या रूपाने त्याला त्याच्या जिद्दीची पावती मिळाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी कौतुक केले आहे.