प्राथमिक शाळेतच पाया मजबूत व्हावा- माधुरी आडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:14 AM2018-07-20T05:14:34+5:302018-07-20T05:15:30+5:30

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनी १२०० विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

The foundation should be strong in the primary school says Madhuri Ada | प्राथमिक शाळेतच पाया मजबूत व्हावा- माधुरी आडे

प्राथमिक शाळेतच पाया मजबूत व्हावा- माधुरी आडे

Next

यवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या असीम त्यागामुळेच बाबूजींना देशसेवा करता आली. आज त्यांच्या मुलांनी यवतमाळपासून दिल्लीपर्यंत लौकिक वाढविला. विविध क्षेत्रात यशस्वी होऊनही सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दर्डा परिवाराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे. ही जाणीव ठेवूनच लोकमत परिवाराने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या सहचारिणी वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी नगर परिषदेच्या सर्व शाळांमधील तब्बल १२०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. लोकमत परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्या वतीने येथील मातोश्री दर्डा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते.
प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचे
माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगर परिषद शिक्षण
सभापती नीता केळापुरे, उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्निल तांगडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिलकुमार अढागळे, नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सुसंस्कृतही व्हावे - विजय दर्डा
माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आम्ही नगर परिषद शाळेच्या संस्कारांतूनच घडलो. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची जाणीवही आहे. अशा शाळांसाठी काही तरी केले पाहिजे, या जाणिवेतूनच आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सुसंस्कृतही झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली पाहिजे.

आईचा आदर ठेवला पाहिजे - राजेंद्र दर्डा
माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असतो. ज्यांना आई असते ते भाग्यवान असतात. मुलांनी आईचा नेहमी आदर ठेवला पाहिजे, तरच मुले मोठी झाल्यावर जग त्यांचा आदर करते.

आई ही संस्काराची जननी- कांचन चौधरी
वीणादेवी दर्डा यांनी आपल्या मुलांना संस्काराची शिदोरी दिली आहे. विजयबाबू यांनी खासदार असताना यवतमाळ नगर परिषदेला मोठा निधी दिला होता. आजवर तेवढा निधी कुणीही दिलेला नाही. परंतु, नगर परिषदेच्या सर्व शाळांची अवस्था सुधारावी यासाठी त्यांनी योगदान द्यावे, असे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी सांगितले. यावर विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांनी लगेच शाळांची पाहणी करून पुढील निर्णय घेऊ, असा शब्द दिला.

आईच्या संस्कारांचे मनोज्ञ ‘शेअरिंग’
नगर परिषद शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांसोबत माजी खासदार विजय दर्डा आणि माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अत्यंत मनमोकळा संवाद साधला. शिकण्यासाठी प्रोत्साहित करताना या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. आई संस्कारांची शिदोरी असते. आई आपल्यासाठी किती मेहनत घेते, आपल्या वर्तनातून कशी संस्कार करते हे सांगताना त्यांनी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या जीवनातील उदाहरणे मुलांना सांगितली.

 

Web Title: The foundation should be strong in the primary school says Madhuri Ada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.