सुधाकररावांच्या काळात राज्याच्या विकासाचा पाया
By admin | Published: August 24, 2016 01:07 AM2016-08-24T01:07:24+5:302016-08-24T01:07:24+5:30
सुधाकरराव नाईकांची कारकीर्द राज्याच्या विकासाचा पाया भक्कम करणारी होती. त्यांनी मुख्यमंत्री काळात अनेक विकास कामे केली.
मनोहरराव नाईक : जयंतीनिमित्त मारवाडी व वसंतवाडी येथे विविध कार्यक्रम
पुसद : सुधाकरराव नाईकांची कारकीर्द राज्याच्या विकासाचा पाया भक्कम करणारी होती. त्यांनी मुख्यमंत्री काळात अनेक विकास कामे केली. पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारण खात्याची निर्मिती केली. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द अल्प असली तरी कायम स्मरणात राहणारी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी केले.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मारवाडी बु. व वसंतवाडी येथे डीजिटल शाळेचे उद्घाटन व रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, उपसभापती विवेक मस्के, ययाती नाईक, के.डी. जाधव, सदबाराव मोहटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोयर, जयवंतराव पाटील, बाजार समिती सभापती दिलीप बेंद्रे, दयाराम चव्हाण, दिलीप पारध, राजेश आसेगावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन लालदिव्याची गाडी सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्री काळात मिळाली. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राज्यभर यशस्वी केल्याचे सांगितले. रोगनिदान शिबिरात डॉ. अविनाश जाधव, डॉ. अनिल राठोड, डॉ. आशिष कदम, डॉ. विद्या राठोड, डॉ. रामचंद्र राठोड, डॉ. सातपुते, डॉ. भोंगाडे, डॉ. ताटेवाड यांनी रुग्णांची तपासणी केली. यशस्वीतेसाठी सरपंच जांबुवंत राठोड, शेषराव राठोड, संजय डोईफोडे, विष्णू चव्हाण, साहेबराव चव्हाण, नामदेव राठोड, बबन चवरे, मनोज आडे, नंदेश चव्हाण, सुनील ढाले, प्रदीप राठोड यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)