महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई

By सुरेंद्र राऊत | Published: September 13, 2024 09:51 PM2024-09-13T21:51:18+5:302024-09-13T21:51:53+5:30

तब्बल एक महिन्यानंतर मिळाला कारवाईचा मुहूर्त...

Four arrested including Mahajan couple in Mahila Bank embezzlement, SIT action | महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई

प्रतिकात्मक फोटो


यवतमाळ : बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ काेटींचा अपहार झाला आहे. यामध्ये २०६ जणांवर आराेप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात सहकार विभागाने नियुक्त केलेल्या विशेष लेखा परिक्षक यांच्या तक्रारीवरून १३ ऑगस्ट राेजी २०६ जणांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. यानंतर तब्बल महिनाभराने पाेलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी पहाटेच चार आराेपींना अटक केली. बॅकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन, विलास सुधाकर माहजन या दाम्पत्यासह इतर चाैघांचा समावेश आहे. 

अपहाराचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीने शुक्रवारी पहाटे अचानक माेहीम हाती घेतली. राजकीय आश्रयामुळे अटक हाेणार नाही, या अर्विभावात असलेल्या आराेपींना माेठा धक्का बसला. एसआयटी पथकाने सर्व प्रथम राजन्ना अपार्टमेंट येथून महाजन दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळेतच सत्यनारायण ले-आऊट येथून ॲड. वसंत माेहर्लीकर, नेर येथील नवलकिशाेर रमेशचंद्र मालाणी यांना अटक केली. या चाैघांवरही विशेष लेखा परिक्षकांनी गंभीर स्वरूपाचे आराेप केले आहेत. बॅंकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना सुजाता महाजन यांनी पती विलास महाजन यांच्यासह जवळच्या नातेवाइकांच्या नावाने माेठ्या रकमेच्या कर्जाची उचल केली आहे.

यातून मालमत्ताची खरेदी केल्याचाही आराेप आहे. ही कर्जाऊ रक्कम त्यांनी बॅंकेकडे परत केली नाही. अपहरातील २०६ आराेपींमध्ये महाजन दाम्पत्याचे कृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याने एसआयटीने अटकेच्या कारवाईची सुरुवात त्यांच्यापासून केली आहे. या दाम्पत्याला पहाटे अटक करून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसविण्यात आले हाेते. सायंकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हजर करण्यात आले. या कारवाईबाबत एसआयटी प्रमुख चिलुमुला रजनिकांत यांना विचारणा केली असता, त्यांनी अधिकृत माहिती ही पाेलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडूनच मिळेल असे सांगितले. त्यावरून एसपी चिंता यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी चार आराेपींना अटक झाली असून, त्यांची काेठडी घेण्यात येईल, असे सांगितले. 

पाेलिस कारवाई हाेताच इतर आराेपी पसार 
महिला बॅंकेत असलेला गरिबांचा पैसा लुबाडणाऱ्यामध्ये २०६ जणांवर आराेप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही महिनाभरात काेणतीच कारवाई झाली नाही. फाॅरेन्सिक ऑडीटचे कारण पुढे केले जात हाेते. यावरून ठेवीदार संतप्त झाले, त्यांनी बुधवार ४ सप्टेंबर राेजी निवेदन देऊन आंदाेलनाचा इशारा दिला. त्यानंतर पाेलिस ॲक्शन माेडवर आले. एसाआयटीने शुक्रवारी पहाटे चार आराेपींना अटक केल्यानंतर, इतरांचे धाबे दणाणले आहेत. इतर २०२ आराेपी ही माहिती मिळताच गाव साेडून पसार झाले आहे. काहींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर निर्णय झालेला नाही.

Web Title: Four arrested including Mahajan couple in Mahila Bank embezzlement, SIT action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.