बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले
By admin | Published: July 23, 2014 11:49 PM2014-07-23T23:49:27+5:302014-07-23T23:49:27+5:30
बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. परिणामी बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे ५० सेमी उंचीने उघडण्यात आले. प्रति सेकंद १८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बाभूळगाव : बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. परिणामी बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे ५० सेमी उंचीने उघडण्यात आले. प्रति सेकंद १८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बाभूळगाव तालुक्यात गेल्या ४८ तासात जोरदार पाऊस झाला. गत २४ तासात ६२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे बेंबळा प्रकल्पाच्या जलसंचयात वाढ झाली आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ३२०.६७ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात १३३.६१ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४१.४९ टक्के पाणीसाठा आहे. अधिक पाणीसाठा झाल्याने बुधवारी बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. नदी तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तालुक्यात झालेल्या पावसाने अनेक शेतात पाणी शिरले असून गवंडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
लोअर वर्धा प्रकल्पाचे सात गेट उघडले असून २८२ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. (प्रतिनिधी)