पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन बालकांसह चौघांवर हल्ला
By अविनाश साबापुरे | Published: May 20, 2023 04:59 PM2023-05-20T16:59:26+5:302023-05-20T16:59:54+5:30
Yawatmal News पिसाळलेल्या कुत्र्याने तीन बालकांसह चौघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी बालकांना प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : पिसाळलेल्या कुत्र्याने तीन बालकांसह चौघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी बालकांना प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी वॉर्ड क्रमांक चारमध्ये आयुष अमोल गुदाल (वय ८) आपल्या भावंडासोबत खेळत होता. यावेळी त्याच्यावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढविला. उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केल्याने कुत्र्याने पळ काढला. मात्र, या हल्ल्यात आयुषच्या गालावर, तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तर, दुसरी घटना वॉर्ड क्रमांक सहामध्ये घडली. तेथेही याच कुत्र्याच्या हल्ल्यात विनोद विलास मोटे हा ६ वर्षीय बालक जखमी झाला. त्याच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून या दोघांनाही फुलसावंगी येथे प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. या घटनेनंतर याच कुत्र्याने पुन्हा दोघांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. त्यापैकी एक बालक, तर एक तरुण असल्याचे समजते. पिसाळलेल्या कुत्र्याने गावात बालकांना लक्ष्य केल्याने पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.