मडकोना घाटात अपघात, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:28 PM2018-04-28T23:28:14+5:302018-04-28T23:28:14+5:30

परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दोन कारची धडक होवून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील मडकोना घाटात घडली.

Four injured in accident in Madkona Ghat | मडकोना घाटात अपघात, चार जखमी

मडकोना घाटात अपघात, चार जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दोन कारची धडक होवून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील मडकोना घाटात घडली.
संतोष तोडामन कांबळे (५०), सुप्रिया संतोष कांबळे, सुबोध संतोष कांबळे (१३) रा.यवतमाळ व अवी हजारे (३२) रा.कळंब अशी जखमींची नावे आहे. कांबळे परिवारातील सदस्य इंडिकाने यवतमाळकडे जात होते, तर अवी हजारे हा इनोव्हाने कळंबकडे येत होता. मडकोना घाटात या दोन वाहनांची टक्कर झाली. दरम्यान, यवतमाळहून कळंबकडे येत असलेले कळंब नगरपंचायतीचे अध्यक्ष दिगांबर मस्के यांनी सर्व जखमींना आपल्या वाहनाने यवतमाळ येथे रुग्णालयात हलविले.

Web Title: Four injured in accident in Madkona Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात