तीन अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:52 PM2018-09-06T21:52:08+5:302018-09-06T21:52:32+5:30

उमरखेड, महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या.

Four killed in three accidents | तीन अपघातात चार ठार

तीन अपघातात चार ठार

googlenewsNext
ठळक मुद्देसात जखमी : उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड/महागाव/आर्णी : उमरखेड, महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या.
महागाव तालुक्यातील अंबोडा बसस्थानकानजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यांच्या मधात आॅटोरिक्षा सापडला. या अपघातात ट्रकचालक राम मुकिंदा भोसले जागीच ठार झाला. तर आॅटोरिक्षातील गजानन दिगांबर बसवंते (३२) रा.करंजी ता.महागाव यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. शे.शादूल हुसेन शेख रा.शिरूड ताजबाग ता.अहमदपूर जि.लातूर, राम भोसले आणि गजानन बोजावते अशी जखमींची नावे आहेत. महागाव-यवतमाळ मार्गावरील अंबोडा बसस्थानकानजीक हा भीषण अपघात घडला. ट्रक (क्र.एम.एच.२४/एफ-९१११) आणि दुसरा ट्रक (क्र.एम.एच.२४/ए.यू.-४७३३) यांची समोरासमोर धडक झाली. यात दोन जण जागीच ठार झाले. जखमी तिघांना उपचारार्थ हलविले आहे.
आर्णीनजीक दत्तरामपूर येथे आयशर वाहनाने (क्र.एम.एच.१३/ ए.एक्स-४५६२) आॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.२९/व्ही.८९०८) धडक दिली. यातील सुनीता काळे, अनंता काळे, कीर्ती काळे, अजय काळे, संतोष काळे सर्व रा.लोणी हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते जखमींना आॅटोरिक्षातून बाहेर काढत असतानाच समोरून येणाऱ्या ट्रेलरने (क्र.एम.एच.३१/सी.बी.७६०४) त्यांना धडक दिली. या अपघातात ऋषी इंगळे व जमीर पठाण जखमी झाले. आॅटोतील जखमी अजय अनंतराव काळे यांचा उपचारादरम्यान यवतमाळ येथे मृत्यू झाला. या प्रकरणी आयशर चालक अभिजित दिलीप साळुंके (२६) रा.काटेसावरगाव जि.उस्मानाबाद आणि ट्रेलर चालक मुकेश कलिदेव रामटेके (३५) रा.टेकडी ता.मुल जि.चंद्रपूर यांच्याविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेला बसने चिरडले
उमरखेड येथे पुसद रोडवरील शासकीय रुग्णालयासमोर स्कुटीवरील महिलेचा तोल गेला. मागून येणाºया बसखाली (क्र. एम. एच.४० / एन.९८५६) ही महिला चिरडली गेली. त्यात शीला सुभाष पेन्शनवार (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मुलीसह स्कुटीने जात असताना हा अपघात घडला.

Web Title: Four killed in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात