एसटी-कार अपघातात चार ठार, तीन गंभीर; नेर जवळील घटना 

By सुरेंद्र राऊत | Published: December 4, 2022 03:08 PM2022-12-04T15:08:59+5:302022-12-04T15:10:25+5:30

यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

Four killed, three seriously in ST-car accident Incident near Ner | एसटी-कार अपघातात चार ठार, तीन गंभीर; नेर जवळील घटना 

फोटो - किशोर वंजारी

googlenewsNext

नेर (यवतमाळ) : नांदगाव खंडेश्वर येथील लग्नाचा स्वागत समारोह आटोपून कारने यवतमाळकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. नेर शहरालगत असलेल्या लोणीजवळ भरधाव कार एसटी बसला धडकली. हा अपघात रविवारी सकाळी १०.३० वाजता घडला. यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

अभियंता राधेश्याम अशोक इंगोले (२६), त्याची आई रजनी अशोक इंगोले (४५) दोघे (रा. रुपनगर वडगाव रोड, यवतमाळ) वैष्णवी संतोष गावंडे (१८), सारिका प्रमोद चौधरी (२८) (रा. पिंपळगाव जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. साक्षी प्रमोद चौधरी (१९), प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सविता संतोष गावंडे (४४) हे तिघेही गंभीर जखमी आहे. एसटी बसमध्ये असलेले सचिन शेंद्रे, धनंजय मिटकरी हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

राळेगाव आगाराची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. तर एमएच-२९-बीसी-९१७३ या कारमधून तीन कुटुंबातील सात जण यवतमाळकडे येत होते. कार समोरासमोर एसटी बसवर धडकली. या भीषण अपघातात कार चालवित असलेला अभियंता राधेश्याम इंगोले, त्याची आई रजनी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर यवतमाळ रुग्णालयात उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे व सारिका चौधरी या दोघी दगावल्या. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यात आली. नेर येथील रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात आणले. तेथून यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. यवतमाळात जखमींवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी दोन महिलांना नागपूर रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात परिसरात तीनही परिवारातील सदस्य आपला शोक व्यक्त करीत होते.
 

Web Title: Four killed, three seriously in ST-car accident Incident near Ner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.