पुसदच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी चार लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:28 AM2021-07-04T04:28:00+5:302021-07-04T04:28:00+5:30
पुसद : तालुक्यातील पारध येथे ७ जून २०२१ रोजी वीज पडून खुशाल बाबूसिंग राठोड (३५) यांचा मृत्यू झाला होता. ...
पुसद : तालुक्यातील पारध येथे ७ जून २०२१ रोजी वीज पडून खुशाल बाबूसिंग राठोड (३५) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासह इतरही कुटुंबीयांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्यात आला.
घरातील कर्ता व्यक्ती गमाविल्याने राठोड कुटुंबीयावर संकट कोसळले होते. जमशेटपूर येथे ९ जूनला वीज पडून पिंटू शेषराव जाधव यांच्या १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनेचा तहसीलदार अशोक गीते यांनी तत्काळ पोलिसांच्या ताफ्यासह पंचनामा केला होता. त्यानंतर अहवाल शासनाला पाठवून निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला. शासनाने तत्काळ दखल घेत दोन्ही कुटुंबीयाच्या प्रमुखांना प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्याचे आदेश दिले होते.
आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते अंजली खुशाल राठोड व पिंटू जाधव यांना हे धनादेश देण्यात आले. यावेळी तहसीलदार अशोक गीते, तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. शासनाकडून मिळालेल्या निधीतून काही प्रमाणात का होईना हातभार लागल्याने प्रशासनाचे आता चोहोबाजूने कौतुक होत आहे.