‘मेडिकल’मध्ये येणार चार कोटींची यंत्रसामग्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:22 PM2018-10-26T22:22:05+5:302018-10-26T22:23:00+5:30
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. शस्त्रक्रियागृहासह रुग्णालयाच्या मेसकरिता अद्ययावत मशनरी खरेदी केली जाणार आहे. या खरेदीला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.
रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरमध्ये लागणारे अॅटोमॅटिक इम्यूनोसरी अॅनलायझर, फेको अॅण्ड व्हिक्ट्रोटॉमी, फ्रॅक्शनल सीओ २ लेझर युनिट, एलईडी ओटी लाईट विथ एचडी कॅमेरा, डायोट लेझर युनिट यासह साईडलोड वॉश्ािंग मशीन, इलेक्ट्रो हायड्रोलिक आॅपरेशन टेबल, एनडी याग लेझर, आॅटोमोटेड ब्लड अॅण्ड मायक्रोबॅक्टेरियल कल्चर सिस्टीम, ब्लड बँक रेफ्रिजिरेटर, किचनसाठी चपाती मेकींग मशीन, व्हेजीटेबल्स कटर, प्लॅट फॉर्म ट्रॉली, ग्रार्इंड मिक्सर अशी विविध प्रकारची मशनरी खरेदी केली जाणार आहे. याला नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली असून याची प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनायालकडून राबविली जाणार आहे. ही यंत्र हाताळण्यासाठी नवीन पदनिर्मितीची आवश्यकता आहे काय, याची खातरजमा करण्याचे निर्देश नियोजन समितीने अधिष्ठात्यांना दिले आहे. हा प्रस्ताव हाफकीन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि. यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ३१ मार्चपूर्वी याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या यंत्र सामुग्रीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सुविधांमध्ये वाढ होणार आहे.