भोसा येथे चौघांना घातक शस्त्रांसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:26 PM2018-05-08T22:26:50+5:302018-05-08T22:26:50+5:30
आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली.
सय्यद कादर सय्यद दाऊद (३४), तलहाअली अनवरअली (२०) दोघेही रा. डेहणकर ले-आऊट भोसा, परवेज खान उर्फ बंटीलाला शम्मी खान (२६) रा. इंदिरानगर आणि तनवीर शहा उर्फ तन्नू अलीम शहा (२५) रा. अलकबीरनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. सोमवारी रात्री हे चौघे जण हातात घातक शस्त्रे घेऊन असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने अटक केली. आपसी वादातून हल्ला करण्याच्या तयारीत हे चौघे जण असल्याचे पुढे आले. या चौघांविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांच्या नेतृत्वात टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, सतीश सिडाम, आकाश सहारे, प्रवीण मेंगरे, शशीकांत चांदेकर यांनी केली.