‘मेडिकल’च्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:46 PM2019-06-11T23:46:45+5:302019-06-11T23:48:35+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ४ दर्जाच्या सेवा खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या माध्यामातून घेण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे. यासंदर्भात निविदा सूचनेची जाहिरात प्रसिद्ध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ४ दर्जाच्या सेवा खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या माध्यामातून घेण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे. यासंदर्भात निविदा सूचनेची जाहिरात प्रसिद्ध झाली. खाजगीकरणाविरोधात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
वर्ग ४ कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणून त्यांचे पद गोठविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. सरळ सेवेतून वर्ग ४ पदाची भर्ती होणार नाही. सर्वांना सरकारी नोकरीस मुकावे लागणार आहे. या जाचक निर्णयाविरुद्ध चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बामणे, मनोज गुजरे, रामनाथ अहीर, देवांगणा मेश्राम, दत्ता ठाकरे, विजय तायडे, विजया गेडाम, जनाबाई कनाके या कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मानकर, सरचिटणीस राम तोडासे, विभागीय संघटक शिला पेडणेकर, सु.म. गिरी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.