रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा

By admin | Published: March 20, 2017 12:25 AM2017-03-20T00:25:52+5:302017-03-20T00:25:52+5:30

मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात अंगीकारून उमरखेड शहरात मिस्त्री काम करणाऱ्या

Free Auto Service for Patients | रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा

रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा

Next

मानव सेवा : मिस्त्री काम करणाऱ्या युवकाचा उपक्रम
उमरखेड : मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात अंगीकारून उमरखेड शहरात मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा सुरू करून समाजापुढे समाजसेवेचे एक नवे उदाहरण पुढे आणले आहे.
शहरातील काझीपुरा येथील सै.सादिक सै.अब्दुल रहेमान या मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने दरमहा १५ हजार रुपयांचा खर्च उचलून रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ढाणकी मार्गावर भीषण अपघात झाला होता. त्या अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नव्हते. ही घटना सादिक यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या पैशाने आॅटो करून जखमींना रुग्णालयात पोहोचविले. या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी रुग्णसेवेचा ध्यास घेतला आणि रुग्णांसाठी विनामूल्य आॅटोसेवा सुरू केली. त्यासाठी पदरमोड करून त्यांनी आॅटो घेतला. हा आॅटो २४ तास केवळ रुग्णसेवेसाठी उमरखेड शहरात फिरत असतो. त्याचा शेकडो रुग्णांना फायदा होत आहे.
मिस्त्री काम करून रुग्णांच्या सेवेसाठी सतत झटणाऱ्या सै.सादिक रहेमान याच्या सामाजिक कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तसेच समाजातील इतरही दानशूर मंडळींनी यातून प्रेरणा घेवून अशा प्रकारचे उपक्रम राबवावे, असा एक सूर जनमाणसातून उमटत आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Free Auto Service for Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.