कृत्रिम हातपाय बसविण्याचे मोफत शिबिर
By admin | Published: October 17, 2015 12:32 AM2015-10-17T00:32:30+5:302015-10-17T00:32:30+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ...
१८ आॅक्टोबरला आयोजन : जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशनचा उपक्रम
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय (जयपूर फूट) बसविण्याचे मोफत शिबिर १८ आॅक्टोबर रोजी आयोजित केले आहे.
येथील दर्डा मातोश्री सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन व इतर कारणांमुळे पाय कापलेल्या रुग्णांना या कृत्रिम हातापायांमुळे नवजीवन प्राप्त होणार आहे. कृत्रिम अवयव वापरण्यास अगदी सोपे असून पूर्वीप्रमाणेच चालण्यासह सर्व कामे करता येतात. अगदी सायकल, रिक्षा, अॅथेलेटीक्स खेळ व नृत्यांसह या अवयवांच्या सहाय्याने भाग घेता येते. या शिबिरासाठी संबंधितांनी शनिवार १७ आॅक्टोबर दुपारी ४ वाजेपर्यंत नोंदणी करावी. वेळेवर नोंदणी केली जाणार नाही. तसेच पोलिओग्रस्त रुग्णांनी या शिबिरासाठी नोंदणी करू नये. यवतमाळात होणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी विलास देशपांडे (९४२३१३५४००), सुभाष यादव (९४२३४३२०६६), प्रा. अभय भीष्म (९४२३४३५९८७), प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर (९८२३५५२२११) यांच्याशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)