यवतमाळात आज जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण
By admin | Published: November 22, 2015 02:29 AM2015-11-22T02:29:30+5:302015-11-22T02:29:30+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवाणी मिशनच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना ....
२२४ अपंगांना मिळणार कृत्रिम हातपाय : जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवानी मिशन पुणेचा उपक्रम
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवाणी मिशनच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित आहे. यावेळी २२४ अपंगांना कृत्रिम हातपाय वितरित केले जाणार आहे.
लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते कृत्रिम हातपायांचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमत समाचार औरंगाबादचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव यांच्यासह साधू वासवानी मिशन पुणेचे तज्ज्ञ मिलिंद जाधव, पुणे येथील कृत्रिम हातपाय विशेषज्ञ सलिल जैन उपस्थित राहणार आहे.
यवतमाळात गत १८ आॅक्टोबर २०१५ रोजी कृत्रिम हातपाय (जयपूर फूट) बसविण्याचे नि:शुल्क शिबिर घेण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या अपंगांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी २२४ अपंग कृत्रिम हातपाय बसविण्यायोग्य आढळून आले. त्यांच्या हातापायाचे माप घेण्यात आले. आता कृत्रिम हातपाय तयार झाले असून २२ नोव्हेंबर रोजी अपंगांना कृत्रिम हातापायाचे वितरण केले जाणार आहे.
१८ आॅक्टोबरच्या शिबिरात ज्या अपंगांची तपासणी करून हातापायाचे माप घेण्यात आले. त्यांनी कागदपत्रांसह २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दर्डा मातोश्री सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विलास देशपांडे (९४२३१३५४००), सुभाष यादव (९४२३४३२०६६), प्रा.अभय भीष्म (९४२३४३५९८७) आणि प्रेमेंद्र रामपूरकर (९८२३५५२२११) यांच्याशी संपर्क साधावा.