फुकटातील जेवण आता हाेणार बंद, द्यावे लागणार ५ रूपये; वर्षभरात तब्बल ३१ कोटी थाळ्या फस्त

By अविनाश साबापुरे | Published: June 30, 2023 10:28 AM2023-06-30T10:28:18+5:302023-06-30T10:28:43+5:30

Yavatmal: सरसकट बांधकाम कामगारांना रोजमजुरीसोबतच मोफत जेवण देण्याचीही योजना गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू आहे.

Free meals will be closed now, 5 rupees will have to be paid; As many as 31 crore thalas are sold in a year | फुकटातील जेवण आता हाेणार बंद, द्यावे लागणार ५ रूपये; वर्षभरात तब्बल ३१ कोटी थाळ्या फस्त

फुकटातील जेवण आता हाेणार बंद, द्यावे लागणार ५ रूपये; वर्षभरात तब्बल ३१ कोटी थाळ्या फस्त

googlenewsNext

- अविनाश साबापुरे
यवतमाळ - सरसकट बांधकाम कामगारांना रोजमजुरीसोबतच मोफत जेवण देण्याचीही योजना गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू आहे. वर्षभरात तब्बल ३१ कोटी ७४ लाखांपेक्षा अधिक मोफत थाळ्या वाटप झाल्याची आकडेवारी आरटीआय कार्यकर्ते विशाल ठाकरे यांनी केलेल्या माहिती अधिकारातून पुढे आली. आता १ जुलैपासून केवळ नोंदणीकृत कामगारांनाच जेवण दिले जाणार असून, त्यासाठी पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे. 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना मध्यान्ह भोजन वितरित करण्याची योजना राबविली जात आहे. परंतु, अनेक ठिकाणी यात कामगारांच्या नावावर भलतेच लोक जेवण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत मंडळाच्या सचिवांनी शासनाशी पत्रव्यवहार करून योजनेत काही बदल प्रस्तावित केले होते. 

आता केवळ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या व सक्रिय (जीवित) असलेल्या कामगारांनाच पाच रुपयांत  मध्यान्ह भोजन वितरित करण्याचे निर्देश राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिले आहेत.

वर्षभरात मोफत वाटप झालेल्या थाळ्यांचा तपशील
    मुंबई शहर    १,०६,८७,४९०
    मुंबई पश्चिम     ५६,२०,७८२
    मुंबई पूर्व     ५१,२९,०५४
    नवी मुंबई     १४,९६,२३८
    ठाणे     ५३,३०,००४
    कल्याण     २४,२९,००७
    रायगड     ४८,२५,४३६
    पालघर    ८,५३,४८०
    पुणे    २,१०,८७,५१९
    सोलापूर    २,१३,१०,६०१ 
    बार्शी    १८,८५,६५४
    कोल्हापूर    २,१५,५६,०५३ 
    सांगली    ४४,६३,७२७ 
    सातारा    ३२,८२,६९४ 
    इचलकरंजी    १,८१,८९,०४३ 
    संभाजीनगर    १,००,८२,१३४ 
    लातूर    ९९,१२,०११ 
    बीड    ६५,४२,१८० 
    जालना    १,९९,६२,९२५ 
    परभणी    ५७,७५,७७२ 
    हिंगोली    ७५,३२,४९३ 
    नांदेड    ३२,७५,७८८ 
    धाराशिव    ७५,२७,११० 
    नागपूर    २,६१,६८,६८२ 
    वर्धा    २५,०५,५२३ 
    भंडारा    ४८,६८,२०४ 
    गडचिरोली    ५०,२८,३१० 
    चंद्रपूर    ३,५२,९५,०४२ 
    अकोला    ६३,१३,७९७ 
    अमरावती    ७९,६६,२८२ 
    वाशिम    १३,११,४५२ 
    यवतमाळ    ३१,८२,११५ 
    बुलडाणा    १,६९,२९,०२० 
    नाशिक    ६३,२०,७३७ 
    अहमदनगर    २७,५३,७४५
    एकूण    १,७४,००,१०४

Web Title: Free meals will be closed now, 5 rupees will have to be paid; As many as 31 crore thalas are sold in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.