फ्री मेथॉडीस्टची स्रेहल सर्वाधिक ९९.६० टक्के गुणांसह अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:05 PM2018-06-09T22:05:57+5:302018-06-09T22:05:57+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत येथील स्नेहल मनोज घाडगे हिने ९९.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. येथील फ्री मेथॉडिस्ट स्कूलमधून स्नेहलने दहावीची परीक्षा दिली होती. तिला ५०० पैकी ४८८ गुण मिळाले आहेत.

Free Methodist's Sealhal tops with 99.60 percent marks | फ्री मेथॉडीस्टची स्रेहल सर्वाधिक ९९.६० टक्के गुणांसह अव्वल

फ्री मेथॉडीस्टची स्रेहल सर्वाधिक ९९.६० टक्के गुणांसह अव्वल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत येथील स्नेहल मनोज घाडगे हिने ९९.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.
येथील फ्री मेथॉडिस्ट स्कूलमधून स्नेहलने दहावीची परीक्षा दिली होती. तिला ५०० पैकी ४८८ गुण मिळाले आहेत. तर १० गुण कला, क्रीडा विषयाचे मिळाले आहे. विशेष म्हणजे, संस्कृत विषयात तिने १०० पैकी १०० गुण पटकावले आहेत. कळंब पंचायत समितीमधील जिल्हा परिषद शिक्षिका सविता घाडगे व हार्डवेअर व्यावसायिक मनोज घाडगे यांची ती गुणी कन्या आहे. अभ्यासात अपार मेहनत घेणारी स्नेहल खेळ आणि संगीतातही निपुण आहे. बॅडमिंटन खेळात ती राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळली आहे. त्यासोबतच तिने संगीत आणि चित्रकलेच्याही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. स्नेहल डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून आहे.

Web Title: Free Methodist's Sealhal tops with 99.60 percent marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.