परिवहनतर्फे मुलींना मोफत पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:19 PM2018-11-05T21:19:20+5:302018-11-05T21:19:35+5:30

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.च्या मोफत पासची ‘अहिल्याबाई होळकर योजना’ बारावीपर्यंत मुलींना लागू केली. ही योजना लाखो मुलींना वरदान ठरली असून ती आम्हाला दिवाळी भेटच असल्याच्या प्रतिक्रीया मुलींनी येथे व्यक्त केल्या.

Free passes to girls by transport | परिवहनतर्फे मुलींना मोफत पास

परिवहनतर्फे मुलींना मोफत पास

Next
ठळक मुद्देदिवाळी पर्वावर दिली भेट : हजारो मुलींनी घेतला लाभ

विनोद ताजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.च्या मोफत पासची ‘अहिल्याबाई होळकर योजना’ बारावीपर्यंत मुलींना लागू केली. ही योजना लाखो मुलींना वरदान ठरली असून ती आम्हाला दिवाळी भेटच असल्याच्या प्रतिक्रीया मुलींनी येथे व्यक्त केल्या.
राज्यातील कोणत्याही शाळेत दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना आपल्या गावाजवळच्या शाळेत शिक्षणासाठी जाण्याकरिता राज्य शासनाने ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ सुरू केली. त्यामुळे मुलींना आपल्या आवडीच्या व दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. मुलींना एस.टी.महामंडळाकडून त्रैमासिक मोफत पास दिला जातो. एका मार्गावर किमान एका बसचे विद्यार्थी असल्यास त्या मार्गावर बसची फेरी सुरू करण्याचे सौजन्यही एस.टी.महामंडळाकडून दाखविले जाते. त्यामुळे शाळांमधील मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. ही योजना बारावीपर्यंतच्या मुलींसाठी लागू करावी, अशी मागणी होत होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुलींची ही मागणी दिवाळीच्या पर्वावर मंजूर केली.
आता ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ १२ वीपर्यंतच्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. असंख्य मुलींना आपल्या गावात १२ वीपर्यंत शिक्षणाची सोय नसल्याने गावापासून दुसºया शाळेत शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी मुली एस.टी.चा पास काढून किंवा आॅटोने महाविद्यालयात जात होत्या. पालकांचे ५०० ते ६०० किंवा त्याहून अधिक पैसे मुलीच्या प्रवासासाठी खर्च होत होते. आता राज्य शासनाच्या मोफत पास घोषणेमुळे पालकांच्या खर्चाची बचत होणार आहे. दिवाळीच्या पर्वावरच हातात मोफत पास आल्याने विद्यार्थीनी हरखून गेल्या आहेत. तालुक्यातील शिरपूर येथील श्री गुरूदेव विद्यालयाच्या १११ मुलींना या योजनेचा लाभ मिळाला. या मुली मंदर, केसुर्ली, शेलू, खांदला, बारेगाव, कुरई, ढाकोरी, डोर्ली, वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर या गावांवरून शिरपूर येथे एसटीचा पास काढून शिक्षणासाठी येत आहेत. शनिवारी प्रा.गणेश लोहे यांनी या १११ मुलींना मोफत पासचे वितरण केले. यावेळी प्रा.विजय करमनकर, प्रा.सुधीर वटे, प्रा.सीमा सोनटक्के, प्रा.रूपेश धुर्वे व प्रा.वासुदेव ठाकरे उपस्थित होते.

वणी तालुक्यातील शाळांमध्ये मुलींचाच बोलबाला
मागील काही वर्षापासून वणी तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये मुलींची संख्या मुलाच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. यावरून मुलींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. तसेच गुणवत्तेमध्येही मुली मुलांना मागे टाकून आगेकुच करीत आहे. शळांमध्ये होणाºया स्पर्धा, कार्यक्रम यामध्येही मुलांपेक्षा मुलीच पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Free passes to girls by transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.