सोळा सरकारी रुग्णालयात फ्री आणि सोळा खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:00 AM2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:07+5:30

आरोग्य विभागाने यासाठी १९ टीम तयार केल्या आहे. यामध्ये एक डाॅक्टर आणि चार आरोग्य कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले आहे. याशिवाय १६ केंद्रांवर सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रांवरच ज्येष्ठांना लसीकरण करण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये दोन लाख ८० हजार ९३ ज्येष्ठ नागरिक आहे. या सर्व मंडळींना लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांची आणि लस पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.  

Free vaccine at 16 government hospitals and Rs. 250 at 16 private hospitals | सोळा सरकारी रुग्णालयात फ्री आणि सोळा खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयात लस

सोळा सरकारी रुग्णालयात फ्री आणि सोळा खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयात लस

Next
ठळक मुद्देज्येष्ठांना लसीकरण करण्यासाठी सूचनाच नाही, आरोग्य यंत्रणा आदेशाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आरोग्य विभागाने १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजाराच्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात हा निर्णय आणि या निर्णयाचे आदेश लिखित स्वरूपात आरोग्य विभागाला प्राप्त झाले नाही. यामुळे लसीकरण मोहीम राबविताना काय मार्गदर्शक सूचना प्राप्त होतात त्यानुसार आरोग्य विभाग आपले काम पार पाडणार आहे. 
आरोग्य विभागाने यासाठी १९ टीम तयार केल्या आहे. यामध्ये एक डाॅक्टर आणि चार आरोग्य कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले आहे. याशिवाय १६ केंद्रांवर सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रांवरच ज्येष्ठांना लसीकरण करण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये दोन लाख ८० हजार ९३ ज्येष्ठ नागरिक आहे. या सर्व मंडळींना लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांची आणि लस पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.  

नोंदणी कशी करणार?
नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना मिळायच्या आहे. सध्याच्या घडीला आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि लिडींग कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू आहे. यासाठी आधारकार्ड अथवा पॅनकार्ड घेवून नोंदणी सेंटरवर जायचे असते. त्या ठिकाणी स्वत:च्या नावाची नोंदणी करायची असते. त्यावर नाव, गाव आपला मोबाईल नंबर द्यायचा असतो. यासोबतच पॅनकार्ड अथव आधारकार्डचा नंबर द्यायचा असतो. यानंतरच मॅसेज मिळाल्यानंतर लसीकरण करण्यासाठी स्वत:ला केंद्रावर जाता येते. यामध्येही लसीकरणाचा वेळ ठरलेला आहे. या नियमानुसारच नोंदणी होण्याची शक्यता आहे.

येथे मिळणार कोरोना लस

खासगी हाॅस्पिटल : शाह हाॅस्पिटल, पोटे हाॅस्पिटल, शांती अर्थोपेडीक हाॅस्पिटल, साईश्रद्धा हाॅस्पिटल, संजीवन हाॅस्पिटल, चिंतामणी हाॅस्पिटल, काॅटन सिटी हाॅस्पिटल, श्री दत्त हाॅस्पिटल, संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हाॅस्पिटल दिग्रस, भांगडे हाॅस्पिटल पुसद, चव्हाण हाॅस्पिटल पुसद, आयकाॅन हाॅस्पिटल पुसद, लाईन लाईन मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल पुसद, मेडिकेअर हाॅस्पिटल पुसद, सेवा स्पेशालिटी हाॅस्पिटल उमरखेड
 

शासकीय हाॅस्पिटल : अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र पाटीपुरा, क्रिटीकेअर हाॅस्पिटल, संजीवन हाॅस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय पुसद, वणी, पांढरकवडा, दारव्हा, कुटीर रुग्णालय बाभूळगाव, कळंब, लोही, नेर, दिग्रस, उमरखेड, झरी, महागाव, राळेगाव, घाटंजी. 

कोणाला मिळणार लस
ज्येष्ठ नागरिक आणि को-माॅर्बिड म्हणजेच गंभीर आजाराचे रुग्ण यांना लस देण्याच्या सूचना वरिष्ठपातळीवरून आहे. मात्र त्यासंदर्भात आदेश पोहोचायचे आहे. यामध्ये ६० वर्षावरील ज्येष्ठनागरिक आणि ४५ वर्षावरील गंभीर आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. आता या रुग्णांनी कशी नोंदणी करायची याबाबतच्या मार्गदर्शक सूचना बाकी आहे. 

 

Web Title: Free vaccine at 16 government hospitals and Rs. 250 at 16 private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.