सुखी जीवनासाठी मैत्रीची आवश्यकता

By admin | Published: September 4, 2016 12:49 AM2016-09-04T00:49:26+5:302016-09-04T00:49:26+5:30

मनात कर्म प्राप्ती संस्काराच्या गाठी संग्रहित असतात. राग, लोभ, व्देषाचे विचार प्रथम मानवी मनातून उत्पन्न होतात.

Friendship requirement for a happy life | सुखी जीवनासाठी मैत्रीची आवश्यकता

सुखी जीवनासाठी मैत्रीची आवश्यकता

Next

भदंत ज्ञानज्योती : चिचबर्डी येथे वर्षावास कार्यक्रमानिमित्त धम्म प्रवचन
यवतमाळ : मनात कर्म प्राप्ती संस्काराच्या गाठी संग्रहित असतात. राग, लोभ, व्देषाचे विचार प्रथम मानवी मनातून उत्पन्न होतात. मनातील वाईट विचार आपण बुद्धाच्या धम्म आचरणाने दूर करू शकतो. सुखी जीवनासाठी मानवी मनात करूणेसोबतच मैत्रीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्ञानज्योती महाथेरो यांनी केले.
अमरावती मार्गावर असलेल्या चिचबर्डी येथे सदा अलौकिक बहुउद्देशिय संस्था यवतमाळव्दारा वर्षावासानिमित्त आयोजित धम्म प्रवचनात ते बोलत होते. यावेळी भिक्खुंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रथम धम्मध्वजारोहण करण्यात आले. बुद्धवंदना झाल्यानंतर भिक्खू संघाचे स्वागत मुख्य आयोजक दिनेश करमनकर, वसंत तलमले, कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ ब्राह्मणे, रमेश रंगारी यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक व संचालन बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने यांनी केले. कार्यक्रमासाठी निसार खान, वसंत तलमले, जीवन मुनेश्वर, गजानन सावळे, भारत शेंडे, करूणा शिरसाठ, वंदना करमनकर आदींनी पुढाकार घेतला. भिक्खू संघाला भोजनदान व चिवरदान दिनेश करमनकर यांच्यासह त्यांच्या परिवारातर्फे करण्यात आले. यावेळी दी बुद्घिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Friendship requirement for a happy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.