कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

By Admin | Published: July 21, 2016 12:24 AM2016-07-21T00:24:01+5:302016-07-21T00:24:01+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी उमरखेड येथे विविध सामाजिक

Front of protest against the incident of Kopardi | कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

googlenewsNext

तहसीलवर धडक : विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग
उमरखेड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी उमरखेड येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्यावतीने तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. आरोपींना भरचौकात फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी करीत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांची बैठक घेवून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, रिपाइं, युवा सेना यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड विशे पाटील कृषी परिषद, ज.तु. सा. परिषद, अपंग संघटना, इनरव्हील क्लब, छावा संघटना, गोर सेना, सिद्धेश्वर समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा फोर्स, भीम संघर्ष समिती, सम्राट अशोक ब्रिगेड, जमाते इस्लामी हिंद, एसआयओ संघटना, फोटोग्राफर संघटना, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, श्रीराम मित्रमंडळ, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आदी सहभागी झाले होते.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघालेला हा मोर्चा शहरातील मार्गांवरून तहसील चौकात पोहोचला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. तहसीलसमोर झालेल्या सभेत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, राम देवसरकर, निलोफर पठाण, चितांगराव कदम, संजय बिजोरे, महेश काळेश्वरकर, शिवाजी माने, कविता मारुडकर, मजहरउल्ला खान, फिरोज अन्सारी, गौतम नवसागरे, बालाजी वानखडे यांनी विचार व्यक्त केले. यानंतर मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी सुरेश कदम, चक्रधर पाटील, गुणवंत सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा परिषद सभापती विमल चव्हाण, नगराध्यक्ष उषा अलट, सविता कदम, छाया धूळध्वज, पुष्पा चव्हाण, रेखा भरणे, बाळासाहेब चौधरी, संदीप ढाकरे, गोपाल राठोड, अ‍ॅड.सिद्धार्थ घोंगडे, राम कदम, विश्वंभर वानखडे, जयश्री देशमुख, अ‍ॅड.जयश्री कलंत्री, अरविंद धबडगे, जिल्हा परिषद सदस्य बाळू पाटील चंद्रे, संदीप हिंगमिरे, शिवाजीराव वानखडे, सतीश नाईक, अ‍ॅड.मुडकुळे, युवराज पाटील, वसंतचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर, दत्तराव शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Front of protest against the incident of Kopardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.